या दिशेला घरातील घड्याळ भिंतीवर लटकवा भविष्यात घरात पैसाच पैसा येईल !
नमस्कार, तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो आपल्या घरामध्ये अनेक वस्तू असतात. आपल्यापैकी अनेकांना घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणायची आवड देखील असते. घरामध्ये वस्तू आणल्यावर ती वस्तू ठेवायची कुठे? लावायची कुठे? असा एखादा प्रश्न देखील हमखास निर्माण होत असतो परंतु जर योग्य जागेवर योग्य वस्तू असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो, अन्यथा त्या वस्तूचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो. आपल्यापैकी अनेक जण एक गोष्ट अनुभवत असाल ती म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ असते.घड्याळ हे मानवी जीवनाचे प्रतीक आहे. मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे.
घड्याळाच्या आधारावरच आपण आपले जीवन व्यतीत करत असतो. सकाळपासून ते रात्र पर्यंत आपण घड्याळाच्या इशारावर चालत असतं म्हणून अशावेळी आपल्या घरातील घड्याळ हे योग्य दिशेला असणे गरजेचे आहे त्याचबरोबर अनेकदा लोक चूक देखील करतात ती म्हणजे घरामध्ये कोणत्याही दिशेला घड्याळ लावतात, असे करणे वाईट आहे. आजच्या या लेखांमध्ये आपल्या घरामध्ये घड्याळ हे कोणत्या दिशेला असायला हवे. घड्याळ टांगण्याची नक्की दिशा कोणती चांगली आहे हेच आम्ही सांगणार आहोत, असे जाणून घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसाच पैसा येणार आहे.घड्याळाच्या काट्याप्रमाणेच तुमच्या जीवनामध्ये पैसा देखील वाढणार आहे, चला तर मग जाणून घेऊया घड्याळ लावण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे त्याबद्दल…
आपल्या घरामध्ये असलेले घड्याळाचे महत्त्व यावरूनच आपले भवितव्य अवलंबून असते आणि म्हणूनच आता आपण आपल्या घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा जाणून घेणार आहोत. घराच्या दक्षिण दिशेला कधीच चुकून देखील घड्याळ लावू नका कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच दक्षिण दिशेला कधीच घड्याळ लावू नये. जर तुम्ही दक्षिण दिशेला घड्याळ लावले तर तुमच्या जीवनामध्ये माहिती घटना घडण्याची शक्यता असते व तुमचा काळ देखील वाईट ठरू शकतो आणि म्हणूनच दक्षिण दिशेला घड्याळ लावू नका. आपल्या घरामध्ये यमदेवाचा प्रभाव वाढू शकतो. घरातील सदस्यांना अचानकपणे मृत्यू येऊ शकतो.या सगळ्या वाईट घटना घड्याळ दक्षिण दिशेला लावू नका त्यानंतरची दिशा म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशा ही सूर्यास्त होण्याची दिशा मानली जाते आणि म्हणूनच पश्चिमेला देखील घड्याळ अजिबात लावू नये.
जर तुम्ही या दिशेला घड्याळ लावले तर तुम्ही तुमच्या स्वप्नाला नष्ट करत आहात. तुमच्या स्वप्नांना लांब करत आहात असा देखील अर्थ होतो तुमचे जीवन असताच्या मार्गाने प्रवास करू लागते आणि भविष्यात येणाऱ्या अनेक प्रगतीच्या घटना तुमच्या जीवनातून नाहीशा होतात म्हणूनच येणारी वेळ वाईट ठरू नये, याकरिता घड्याळ कधीही पश्चिम दिशेला लावू नका. आपल्यापैकी अनेकांच्या घरी एकापेक्षा जास्त घड्याळ असतात.घड्याळ जास्त असणे शुभ मानले जाते परंतु हे घड्याळ चांगल्या अवस्थेमध्ये असणे गरजेचे आहे घरामध्ये कधीच बंद घड्याळ ठेवू नये. ज्या घरामध्ये बंद घड्याळ ठेवलेले असतात, बिघडलेली घड्याळ असतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करते. घरात आजारपण वाढते. घरात जबाबदारी अचानकपणे वाढू लागते आणि घरातील मुख्य सदस्यावर एकापेक्षा जास्त ताण तणाव निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होत असते म्हणून घरामध्ये कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा घड्याळ हे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पाठीमागे कधीच लावू नये किंवा जो दरवाजा उघडणार आहे किंवा बंद आहे अशा ठिकाणी व दरवाज्याच्या पाठीमागे घड्याळ देखील लावू नका, असे केल्याने घरातील मुख्य सदस्यावर ताण निर्माण होतो.
अचानकपणे वेगवेगळे संकटे त्याच्या जीवनामध्ये येऊ लागतात आणि घरातील मुख्य सदस्याचे खच्चीकरण होऊ लागते. जर तुम्ही घड्याळ लावणार असाल तर ते घड्याळ गोलाकार आकाराचे किंवा अंडाकृती आकाराचे असणे गरजेचे आहे कोणत्याही आयत किंवा चौकोन आकाराचे लावून नये. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक रंगाला स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असते जर तुमच्या घरी काळा रंगाचे घड्याळ असेल तर ते शुभ मानले जात नाहीत कारण की वास्तुशास्त्रामध्ये काळा रंग अशोक बांधला गेलेला आहे आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये असलेले घड्याळ काळा रंगाचे असेल तर ते बदलून टाका त्या ऐवजी पिवळ्या रंगाचे घड्याळ लावा कारण की पिवळा रंग हा प्रगतीचा रंग मानला जातो.
तसेच घड्याळाचे तोंड हे पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे. पूर्व दिशा हीच सूर्योदयाची दिशा असते. सूर्योदय म्हणजेच आपल्या जीवनामध्ये नवीन प्रगती नवीन आशा नवीन चिमणी उगवण्याची वेळ असते आणि म्हणूनच घड्याळ हे पूर्व दिशेला लावायला हवं असे केल्याने तुमच्या घरामध्ये भरभराट होईल आता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल, त्याचबरोबर उत्तर दिशेला देखील घड्याळ लावणे महत्त्वाचे मानले जाते उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते.कुबेर देवता यांचीही दिशा संबोधली जाते आणि अशावेळी देखील तुम्ही उत्तर दिशेला घड्याळ लावल्याने तुमच्या जीवनात खूप सारे बदल दिसून येतील आणि हे सारे बदल सकारात्मक असतील.
Recent Comments