या मुहूर्तावर करा घटस्थापना, धनवृद्धी, वैभव सर्वकाही प्राप्त होईल.
अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेच्या या नऊ दिवसांच्या सणाला शारदीय नवरात्रोत्सव म्हणून ओळखले जाते. हा सण देशाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. यामध्ये दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. घरात कलश स्थापना केली जाते आणि प्रत्येक घरामध्ये अखंड ज्योत स्थापन केली जाते.
यावर्षी शारदीय नवरात्र ७ ऑक्टोबर पासून १५ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर दसरा देखील १५ ऑक्टोबरलाच असणार आहे. अश्विन प्रतिपदेच्या दिवशी कलश स्थापना करून या नवरात्रोत्सवाची सुरुवात केली जाते. ही स्थापना योग्य मुहूर्तावर करणे खूप गरजेचे आहे.
देवीची पूजा आपण कोणत्याही मुहूर्तावर करू शकतो परंतु काही विशेष उपासनेत शुभ मुहूर्तावरच पूजा केली पाहिजे. असे मानले जाते की, शुभ मुहूर्तावर ग्रह आणि नक्षत्र योग्य स्थितीत असतात. अशा वेळी पूजेचे कोणतेही काम करण्यात अडथळा येत नाही. म्हणूनच ज्योतिषी शुभ मुहूर्तावर कोणतेही काम करायला सांगतात. म्हणूनच घटस्थापना देखील शुभ मुहूर्तावरच करायची आहे.
यावर्षी शुभ मुहूर्ताची वेळ आहे, सकाळी ९.३३ ते ११.२१ मिनिटे तर दुपारी ३.३३ ते ५.०५ मिनिटांपर्यंत. परंतु शक्य असल्यास घटस्थापना ही सकाळच्या मुहूर्तावरच करायची आहे. एकदा घटस्थापना झाली की नंतर नऊ दिवसांनंतर त्याचे विसर्जन केले जाते. या नऊ दिवसात आदिशक्तीची उपासना मनापासून करा. त्याचबरोबर अखंड दीप देखील लावायचा आहे.
ब्रह्मांडात मारक चैतन्यासाहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अश्या आदिशक्तीच अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून मनोभावे पूजा करावी. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. यासाठी घरात पवित्र जागी एक वेदिका तयार केली जाते. नंतर त्यावर सिंहारूड अष्टभुजा देवीची प्रतिमा स्थापन केली जाते.
याजवळ एक घट स्थापून त्याची व देवीची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये व्रतधारी व्यक्तीचे उपवास असतात. नऊ दिवस दररोज नऊ वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालतात व नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.
Recent Comments