या राशी सोबत जिंकणे म्हणजे निव्वळ अशक्य आहे या राशी कुणालाच आपल्यापुढे जाऊ देत नाहीत!

नमस्कार!

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये अश्या काही चार राशी आहेत जयंच्याशी स्पर्धा करताना तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागतो. या राशीची लोकं स्पर्धा करायला नेहमी तयार असतात. स्पर्धा म्हटलं की यांच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो आणि त्या उत्साहाचा परिणाम असा असतो की, त्यांच्याबरोबर स्पर्धा करताना आपण जिंकणं सुद्धा तितकंच अवघड असतं. कारण; ते त्यांच्या ध्येयाबाबत अत्यंत एकाग्र असतात. ते ध्येय साध्य करण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात, त्यांना स्पर्धेमध्ये जिंकायचं असतं आणि ते जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद असे वेगवेगळे हातखंडे त्यांच्या स्वभावानुसार आजमावत असतात. मग कोणत्या आहेत त्या चार राशी ते आपण जाणून घेऊया.

तर त्यातली सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. या राशीचा स्वामी आहे मंगळ जो धैर्य व ऊर्जेचा तारक मानला जातो. मेष राशीची लोक आत्मविश्वासाने भरलेली असतात, त्यांना काय करायचंय हे त्यांच्यापुढे स्पष्ट असतं, त्यांच्या मनात कुठलाही गोंधळ नसतो आणि त्यांचं जे ध्येय ठरलेलं असतं त्याच्यासाठी ते चांगलं कंबर कसून कामाला लागतात. त्यामुळे जर तुमचा स्पर्धक मेष राशीचा असेल तर तुम्हाला सुद्धा प्रयत्नांमध्ये कुठलीही कसूर ठेवता कामा नये कारण; मेष राशीची लोक कुठल्याही प्रकारचं आव्हान स्वीकारायला नेहमी तयार असतात. आणि अर्थात ही लोकं हेल्दि स्पर्धा करतात म्हणजेच समोरच्या स्पर्धकाचा पाय ओढण्यापेक्षा स्वतःच कर्तुत्व वाढवणं, स्वतःच्या क्षमता वाढवणं मेष राशीच्या लोकांना आवडतं आणि त्या गोष्टी करताना ते स्वतःचे सगळे कौशल्य पणाला लावतात.

त्यामुळे जर तुमचा स्पर्धक मेष राशीचा असेल तर तुम्हाला सुद्धा जय्यत तयारी करायला हवी. त्यानंतर वृषभ रास. या राशीचे लोक जरा हट्टी असतात. त्यांना जे हवं आहे ते मिळवण्याबाबतीत त्यांचा उद्दिष्ट ठरलेला असतो. बऱ्याचदा ही लोक थोडी गोंधळलेली वाटली तरीही कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करायला ती तयार नसतात. त्यांना जसे हवं ते मिळवण्यासाठी ते भरपूर चिकित्सा करतात, भरपूर वेळ थांबायलाही तयार असतात आणि त्यांना हवं ते मिळवायला सगळ्या प्रकारची मेहनत करायला सुद्धा ही लोकं तयार असतात. वृषभ राशीची लोक सुद्धा आव्हानांना स्वीकारतात सगळ्या बाजूंनी विचार करतात आणि मग आपलं एक एक पाऊल पुढे टाकत जातात म्हणूनच ही लोकसुद्धा उत्तम स्पर्धक असतात असं म्हणायला हरकत नाही.

त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीला फक्त जिंकायचं असतं आणि यासाठी मग साम-दाम-दंड-भेद यापैकी कुठलाही हातखंडा ही लोक आजमावायला तयार असतात. अर्थात हे लोक कठोर परिश्रम करतात, परिश्रमाची परकष्टा करायला सुद्धा हे लोकं तयार असतात. पण एवढं सगळं करून सुद्धा जर यांना यश मिळत नाही आहे असे यांना दिसलं तर मात्र समोरच्याचा पाय खाली खेचण्यात सुद्धा त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही यांच्यासाठी जिंकणं हे फार महत्त्वाचं असतं. तर मंडळी यापैकी तुमची रास कोणती हे नक्की कळवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *