या 6 राशिं साठी अतिशय शुभ ठरणार ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा मिळणार धन

अशात ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा ठरेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

मेष – प्रगती कराल- ग्रहमान पाहता हा आठवडा सर्व बाबतीत प्रगती करणारा आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. आपल्या मेहनतीचा योग्य परतावा मिळेल. कला, डिझायनिंग, सौंदर्यप्रसाधने अशा क्षेत्रांतील मंडळींना प्रगती करता येईल. तुमचे विचार, आखणी समोरच्यांना पटवून द्याल. प्रवासाचे योग येतील.

वृषभ – आनंददायी आठवडा- ग्रहमान पाहता या आठवड्यात आनंददायी घटनांचा भरपूर आनंद घेता येईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढतीचे योग संभवतात. क्रीडा व तांत्रिक शिक्षण क्षेत्रांतील मंडळींना प्रगती करता येईल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. आपल्या मनाप्रमाणे पुष्कळशा गोष्टी साध्य होतील. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता.

कर्क – इच्छापूर्तीचा काळ ग्रहमान पाहता या आठवड्यात आपल्या मनातील इच्छापूर्तीचा हा काळ राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. मशिनरी, वाहन खरेदी-विक्री, शेती, तांत्रिक क्षेत्रांत काम करणाऱ्यांना हा काळ मध्यम स्वरूपाचा राहील. शेअर बाजार व्यवहारापासून दूर राहा. प्रवासाचे योग येतील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. वादविवादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या.

सिंह – अनुकूलता लाभेल- ग्रहमान पाहता या आठवड्यात पुष्कळशा बाबतीत अनुकूलता लाभल्याने अपेक्षित गोष्टी साध्य होतील. विशिष्ट व्यक्तींचा परिचय होईल, त्याचा लाभ घेता येईल. प्रवासाचे योग येतील. सरकारी नियमांचे पालन करा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत. कुटुंबियांसमवेत प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. प्रकृतीची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा, नियमित व्यायाम व योगाचा वापर करा. जोडीदाराची साथ मिळेल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *