रात्री झोपताना उशाला ठेवा ही गोष्ट, सकाळी अचानक घबाड मिळेल धन पैसा

नमस्कार,

रविवारी रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या डोक्याजवळ ग्लासभर दूध ठेवायचे आहे. हे दूध गायीचं असायला हवे. अनेक लोक उपाय तर करतात पण नियमांचं पालन करत नाहीत.

हा उपाय करत असाल तर त्यासाठी मांसाहार व्यर्ज आहे. कोणाचीही निंदा करणे, मुख्यतः महिलांचा अपमान करणे कटाक्षाने टाळावे. हा उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार आहे आणि जेव्हा लक्ष्मीचे आगमन होत आहे तेव्हा महिलांचा अपमान होता कामा नये. कोणत्याही प्रकारची व्यसन करणे टाळा.

तर मित्रांनो रविवारी रात्री झोपताना आपण आपल्या उशाशी दूध ठेवायचं आहे. झोपताना आपले पाय उत्तर दिशेला करायचे आहेत आणि डोकं दक्षिण दिशेला करावे. तर अशा स्थितीत आपल्या डोक्याजवळ ग्लासभर अथवा तांब्याभर गायीचं दूध ठेवायच आहे. रात्रभर हे दूध तसेच झाकून ठेवायचे.

दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच सोमवारी सकाळी लवकर उठावे. ह्या दुधाच्या भांड्याला उठल्या उठल्या स्पर्श करू नये. उठल्यावर स्वच्छ अंघोळ करायची आहे, आपली सकाळची सर्व कामे पूर्ण करावीत. त्यानंतर हे दूध आपल्या घराजवळील कोणत्याही बाभळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे.

प्रत्येक रविवारी रात्री झोपताना हा उपाय आपण करावा. आणि सोमवारी सकाळी बाभळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध ओतायचे आहे.दर रविवारी हा उपाय केल्यास काही दिवसांतच आपल्याला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. आपल्या कामांमध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे देखील ह्या उपायाने दूर होतील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *