लक्ष्मी पूजेच्या दिवशी करा एक गोष्ट नशीब असे उजळेल की प्रत्यक्ष माता महालक्ष्मी प्रसन्न होईल!
नमस्कार तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे.दिवाळी पैकी एक दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा मानला जातो. या दिवशी प्रत्येक जण माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चना करत असतो आणि म्हणूनच आपल्याला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये जेणेकरून सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच प्रत्येक भक्त माता महालक्ष्मी यांची मनापासून पूजा करत असतो. आज प्रत्येक जण माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक वेगवेगळे उपाय करण्यात आहेत. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला माता महालक्ष्मीची कृपादृष्टी मिळू शकेल आणि भविष्यात तुमचे भाग्य देखील उजळेल, चला तर मग जाणून घेऊया आपल्याला नेमका कोणता उपाय करायचा आहे त्याबद्दल…
दिवाळीच्या सुरुवातीला दिवसांमध्येच आपण प्रत्येक जण घराची साफसफाई करत असतो. साफसफाई केल्याने आपल्या घरामध्ये सर्व वातावरण सकारात्मक असते. ज्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असते, अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते आणि म्हणूनच प्रत्येकाने आपले घर स्वच्छ ठेवायला हवे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक स्फटिकाचे लक्ष्मी यंत्र आणायला हवे. स्फटिकाचे लक्ष्मी यंत्र हे माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हे यंत्र घरी आणल्यानंतर आपल्याला पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करायचे आहे आणि त्यानंतर उदबत्ती दाखवून आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा आहे, असे केल्याने तुम्हाला मनोवांची फळ मिळेल तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कमळांच्या बियापासून तयार केलेली जपमाळ असते, ती जपमाळ घरी आणायची आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे कमळाचे फुल माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. या कमळाच्या माळे नेच आपल्याला माता महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी सकाळ संध्याकाळ माता महालक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला दिप प्रज्वलन करायचे आहे आणि माता महालक्ष्मीचे मंत्र उच्चार करायचे आहे. या दिवशी आपल्याला अंगणा समोर रांगोळी काढा यची आहे आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शक्य झाले तर तुम्हाला गाईला नैवेद्य दाखवायचे. गाईला हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि म्हणूनच माता महालक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळू शकतो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला काचेची स्फटिक बाजारातून विकत आणायचे आहे आणि त्याचे पूजा करायचे आहे त्यानंतर पूजा केल्यावर आपल्याला लक्ष्मी सूक्त किंवा लक्ष्मी अष्टक मंत्र वाचायचे आहे किंवा ऐकायचे आहे, असे केल्याने तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच मिळेल. जर तुम्हाला मंत्र उच्चार जमत नसतील तर अनेक व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता आणि पाहू देखील शकता. दिवाळीच्या दिवशी शक्यतो पैसे खर्च करू नका. तुम्हाला जे काही खर्च करायचा आहे ते आदल्या दिवशी वस्तू सर्व विकत घेऊन या. जर तुम्ही आजच्या या लेखांमध्ये सांगितलेले काही छोटे-मोठे उपाय अवश्य केले तर माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टी घडू लागतील.
Recent Comments