लावलेला दिवा विझला किंवा खाली पडला की घडतो हा संकेत जाणून घ्या हा संकेत शुभ असतो की अशुभ!

प्रत्येकाच्या घरी देवपूजा केली जाते. प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतो. या देवाऱ्यांमध्ये वेगवेगळे देवी देवता आपण यांची मांडणी करत असतो. देवी देवता यांना प्रसन्न करण्यासाठी सुरुवातीला प्रत्येक जण दिवा प्रज्वलित करत असतो. दिव्याशिवाय आपल्या घरातील देवपूजा अपूर्ण मानले जाते. संध्याकाळच्या वेळेला गृहिणी मंडळी देवासमोर दिवा आवर्जून लावत असतात. काहीजण तुपाचा दिवा लावतात. काहीजण तेलाचा दिवा लावतात तर काहीजण लोबान कापूर यांचा मिश्रण तयार करून देखील दिवा प्रज्वलित करत असतात. दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. दिव्याची ज्योत ही आपल्या घरातील अंधकार दूर करून टाकते आणि घरातील सदस्यांना चांगले आरोग्य प्रदान करण्याची क्षमता बहाल करत असते. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये दीपप्रज्वलन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे, ज्या ठिकाणी दीपक प्रज्वलन केले जाते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते.

ज्या ठिकाणी दीपप्रज्वलन केले जात नाही त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत असते आणि म्हणूनच शक्यतो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये देवापुढे दिवा प्रज्वलित करायला हवा. तुळशीमातेसमोर दिवा लावायला हवा, यामुळे तुमच्या जीवनात अनेक बदल घडून येतील हे बदल सकारात्मक असतील. देवपूजा करत असताना अनेकदा दिवा विझतो. दिवा विझणे हे अशुभ मानले जाते परंतु यामागील कोणताही पुरावा धर्मशास्त्रांमध्ये नाही आणि म्हणूनच दिवा विझला तर घाबरून जाऊ नका परंतु दिवा ओवाळताना जर तुमच्या हातातून दिवा पडला तर त्या दिव्याचे पतन शांती करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा खाली पडला त्या ठिकाणी तुम्हाला त्याची शांती देखील करावी लागते. ज्योतिष शास्त्रामध्ये देखील दिव्याचे एक आगळे वेगळे महत्त्व सांगण्यात आलेले आहेत. नेहमी दीप प्रज्वलन केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते आणि म्हणूनच प्रत्येक घरातील सदस्यांनी सकाळी उठल्यावर आपल्या घरामध्ये एक दिवा तरी प्रज्वलित करायला हवा.

दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी दिव्याला आपल्याला हळद कुंकू लावून पूजन करायचे. दिवा आपल्या घरातील वाईट शक्ती दूर करतो असे देखील म्हटलेले आहे त्याचबरोबर प्रत्येकानी संध्याकाळी या शुभम करोति कल्याणम मंत्राचा जप देखील करायला हवा. जर आपण आपल्या घरामध्ये २१ दिवस दीपप्रज्वलन केले नाही तर घरामध्ये मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करते तसेच त्यांना आपल्याला काही गोष्टी लक्षात देखील ठेवायच्या आहेत. जर तुम्ही दिवा तुपाने करत असाल तर अतिशय उत्तम. शुद्ध तुपामध्ये खूप सारे आवश्यक घटक महत्त्वाचे असतात. शुद्ध तूप आणि अग्नीचा एकत्रित संयोग झाला तर घरामध्ये वातावरण शुद्ध मोठ्या प्रमाणावर होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होऊन जाते. जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करत असेल तर तो तुमच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करणार असाल तर तो तुमच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे.

धनप्राप्तीसाठी दिव्याची वात उत्तर दिशेला करायला हवी कारण की उत्तर दिशाही धनाची दिशा म्हणजेच कुबेराची दिशा मानली जाते. पूर्व दिशेला जरी वात केली तरी चालते पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात परंतु पश्चिम आणि दक्षिण या दिशेला दिव्याची वात कधीच ठेवू नका. या दिशा वाईट दिशा मानल्या जातात. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि पश्चिम दिशेला वात केल्याने आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होतात. मित्रांनो आता तुम्हाला लक्षात आले असेल की दीप प्रज्वलन कसे करावे आणि दीप प्रज्वलन करत असताना कोणकोणत्या गोष्टी मुळात लक्षात ठेवायला पाहिजे त्याबद्दल..

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *