वास्तुशास्त्रानुसार या दिशेला ठेवा या वस्तू घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करू लागेल !
मित्रांनो वास्तुशास्त्र हे असे एक शास्त्र आहे, जे तुम्हाला तुमचे घर कसे असावे याबद्दल माहिती सांगत असते. आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तू महत्त्वाचे असते. आपण घर बांधताना घराचं उंबरठापासून ते प्रवेशद्वारापासून ते छतापर्यंत या सर्व गोष्टींची विशेष काळजी घेत असतो तसेच घर बांधल्यानंतर घरामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात किंवा कोणकोणत्या वस्तू नसाव्यात याबद्दल देखील जाणून घेणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्या घरामध्ये अशा खूप सार्या वस्तू असतात त्या वस्तूच्या निरर्थक उपयोगाने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करू लागते. या नकारात्मक ऊर्जेमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. एकदा का तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला तर घरातील सदस्य हळूहळू आजारी पडू लागतात. घरातील सदस्यांचे मानसिक संतुलन बिघडून जाते. नेहमी कोणती ना कोणती अड’चण निर्माण होऊ लागते.
आर्थिक अड’चणी निर्माण होतात, अशा प्रकारच्या अनेक संकटे एकामागे येतच असतात म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात व त्यांची जागा नेमकी कोणती असायला हवी याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे वास्तुशास्त्रामध्ये स्थळ, काळ, दिशा या सर्वांना विशेष महत्त्व आहे. या सर्वांच्या आधारे आपण प्रत्येक वस्तू घरामध्ये ठेवत असतो. घरामध्ये कोणती वस्तू कोणत्या दिशेला असावी याचे एक शास्त्र असते आणि या शास्त्राचा अभ्यास करूनच आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रामध्ये दहा दिशा आहेत परंतु आठ दिशांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो तसेच प्रत्येक दिशा ही कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे आणि म्हणूनच अशावेळी घरामध्ये वस्तू ठेवताना आपल्याला त्याचे भान देखील ठेवणे गरजेचे आहे. ईशान्य दिशा ही साक्षात देवघराची दिशा आहे. या दिशेला देव वास्तव्य करत असतात.
पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशा च्या मध्ये जी दिशा असते तिला ईशान्य दिशा असे म्हणतात. वास्तुशास्त्रामध्ये या दिशेला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. आपल्याला चांगली संपत्ती, संतती त्याचबरोबर कामांमध्ये प्रमोशन जीवनामध्ये सुख शांती वैभव मिळवून देणारी ही दिशा मानली जाते. ईशान्य दिशेला नेहमी देवघर, विहीर, तलाव, पाण्याचा साठा असावा ईशान्य दिशेला शक्यतो पांढरा किंवा हलका पिवळा रंग द्यावा ईशान्य दिशेला नेहमी उतार असावा, असे असल्यास ईशान्य दिशा आपल्याला फळ सकारात्मक देते. ईशान्य दिशेला कधीच कचऱ्याचा डबा, चप्पल, नकारात्मक वस्तू ठेवू नका असे केल्याने या दिशेचा अपमान होतो. या दिशेला बाथरूम बांधतात परंतु असे करणे चुकीचा आहे. या दिशेला शयनगृह किंवा बाथरूम अजिबात बांधू नका, असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
आपल्यापैकी अनेक जण वास्तुशास्त्रानुसार काही उपाय करतात परंतु वास्तुशास्त्र काही उपाय करत असताना तोडफोड केली जाते परंतु अनेक जण तोडफोड न करता काही उपाय करता येतील असे सांगतात, हे फसव ण्याचे धंदे असतात. जर आपण वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय केले तर वास्तुदोष दूर करता येतो त्यानंतरची दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशा ही समृद्ध यांचे प्रतीक मानले जाते. जर पूर्व दिशेला तुमच्या घरामध्ये उतरण असेल तर धनाचे लाभ होत असते. जर पूर्व दिशेला चढण असेल तर धनाचा नाश देखील होत असतो. पूर्व दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवायला हवी तसेच रिकामी असायला हवी असे केल्याने घरामध्ये धन जास्त प्रमाणामध्ये येते व घरात सुख शांती समृद्धी नांदते. पूर्व दिशेला जर काही दोष असेल तर महिलांना जास्त त्रास होतो आणि म्हणूनच एक लाल रंगाचा दिवा आपल्याला पूर्व दिशेला प्रज्वलित करायचा आहे,
असे केल्याने कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष आपल्याला होत नाही. दक्षिण दिशा ही एक चार दिवसांपैकी महत्त्वाची दिशा आहे परंतु या दिशेला दरवाजा कधीच असू नये, असे असल्यास आपल्याला नेहमी त्रास होतो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि म्हणूनच अनेकदा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. दक्षिण दिशेला पाण्याची टाकी कधीच बांधू नका, असे केल्याने एकामागे एक मृत्यू होण्याची संभावना असते. दक्षिण दिशेला दरवाजा असल्यास त्या दरवाजावर पंचमुखी हनुमान ची मूर्ती किंवा फोटो अजिबात लावू नका. मासिक धर्मामध्ये अनेक महिला या प्रवेशद्वारातूनच प्रवेश करतात, असे अत्यंत चुकीचे आहे. या दिशेला नेहमी उंच झाडे लावायला पाहिजे त्याचबरोबर या दिशेला जर भिंत असेल तर गडद रंग तुम्ही लावू शकता.
Recent Comments