शनिवारी चुकूनही करू नका ही कामे नाहीतर साडेसाती पाठी लागेल.. दुर्लक्ष करू नका

मित्रांनो आज आपण शनिवारी कोणत्या गोष्टी करू नये.. कोणती कामे करू नयेत.. हे पाहणार आहोत शनिवार हा शनी देवाचा वार सोबतच शनिवार हा भैरवनाथांचा वार सुद्धा मानला जातो. या दिवशी काही कामे अशी असतात जी केल्याने शनीचे दोष आपल्या पाठी लागतात आणि जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात, अडचणी वाढतात मित्रांनो ज्यांच्या जीवनात शनीची साडेसाती चालू आहे, अंतर्दशा महादशा चालू आहे अशा लोकांनी ही कामे आवरून टाळावीत..!

शनिवारी ही कामे अज्जिबात करू नयेत, तर चला जाणून घेऊया की शनिवारी कोणती कामे आपण करू नये, त्यातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कार्य ते म्हणजे शनिवारी कोणत्याही परिस्थितीत मिठाची खरेदी करू नये… मीठ खरेदी करून आपल्या घरात आणू नये शनिवारी मीठ खरेदी केल्यास आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो असे हिंदू धर्मशास्त्रात नमूद आहे. सोबतच घरामध्ये सुद्धा दुःख दरिद्रता या गोष्टी निर्माण होतात.

मिठाप्रमाणे या दिवशी तेल, जांभळे काळे तीळ, काळे रंगाचे बूट, लोखंडी साहित्य या गोष्टींची सुद्धा खरेदी करणे आपण टाळावे…! कलम म्हणजेच पेन आणि कागद यांचीसुद्धा खरेदी शनिवारी करण्यास धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे. या दिवशी तीन दिशांना आपण यात्रा म्हणजे प्रवास करणे टाळावे, अन्यथा आपण ज्या कामासाठी जात आहात, ते काम अफल म्हणजे अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते.

या तीन दिशा आहेत पूर्व, उत्तर आणि ईशान्य, ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधली दिशा आणि जाणे जर फारच महत्त्वाचा आहे, तर अशा वेळी आपण पाच पावले पाठीमागे जावे, पाच पावले उलटे जावे तोंडामध्ये आल्याचा तुकडा टाकावा. नंतर आपण या दिशांना प्रवास करू शकता, या तीन दिवसांत दिशान पैकी विशेष करून पूर्व दिशेला दिशा शूल मानण्यात आलेले आहे.

म्हणूनच ही दिशा शक्यतो टाळायला हवी, मात्र जाणे खूप आवश्यक आहे. तर हा उपाय आपण करू शकता, शनिवारच्या दिवशी शनिदेवांना सर्वात अप्रिय असलेली गोष्ट ती म्हणजे दारू या दारूचे कोणत्याही प्रकारे सेवन आपण या दिवशी कृपया करू नका. अन्यथा आपल्या जीवनामध्ये शनीच्या अवकृपेने खूप मोठ्या अडचणी संकटं दुःख कष्ट हे निर्माण होऊ शकतात. मित्रांनो आपल्या घरात जर एखादी विवाहित मुलगी असेल, तर तिला तिच्या सासरी आपण या दिवशी कृपया पाठवू नका.

शनिवारचा दिवस मुलींना सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानण्यात आलेले आहे, या दिवशी लाकूड कोळसा किंवा लोखंडी वस्तू यांची खरेदी करून त्या घरी आणण्यास सुद्धा हिंदु धर्मशास्त्र मनाई करतो, अन्यथा जीवनात कष्ट निर्माण होऊ शकतात. शनिवारी केस कापणे नखे कट करणे या गोष्टी सुद्धा वर्ज मान्यात आलेले आहे, शनिवारी दुधाच्या दह्याचा सुद्धा सेवन आपण करू नये.

जर करायचे असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद किंवा गूळ टाकून आपण त्याचे सेवन करावे, जेणेकरून त्याचे दोष लागणार नाही.शनिवारी वांग किंवा आंब्याचं लोणचं लाल मिरची या वस्तू खाण्यापासून सुद्धा आपण दूर राहावे. या दिवशी आपण असत्य म्हणजेच खोटं बोलू नये, कारण शनिमहाराज आहेत
ते न्यायाची देवता आहेत आपण जे काही चांगली कर्म करतो, त्याचे ते आपल्याला चांगले फळ प्रदान करतात.

मात्र जे काही दुष्कृत्ये वाईट कर्म आपल्या हातून घडतील त्याची अचूक शिक्षा देण्याचे कार्य न्यायदेवता शनिमहाराज करत असतात, आणि म्हणून शनिवारी कोणत्याही परिस्थितीत आपण खोटे बोलायचे नाही. मित्रांनो या दिवशी कोणतेही गरीबाचा अंध-अपंगांच्या किंवा एखाद्या दिन महिलेचा आपण कोणत्याही परिस्थितीत अपमान करू नका. खूप मोठे शनी दोष आहे, हे आपल्याला भोगावे लागू शकतात, तर मित्रांनो शनिवारच्या दिवशी या काही नियमांचे पालन केल्यास शनीची अवकृपा आपल्यावर होणार नाही..

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *