शनिवारी सूर्यास्तानंतर करा हा सोपा उपाय प्रत्येक कामात यश मिळेल, पैसा, सुख समृद्धी लाभेल 100% गुण
मित्रांनो हिंदू धर्मात आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहेत, ज्या प्रमाणे सोमवार हा शिवाला समर्पित आहे’, ‘मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे’, ‘बुधवार श्री गणेशाला समर्पित आहे’, त्याच प्रमाणे ‘शनिवार’ हा “शनी देवाला समर्पित” आहे, शनी देवाला न्याय देवता म्हंटले जाते.
परंतु अनेकांना शनी देवांचे नाव ऐकताच मनामध्ये भीती निर्माण होते, मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव हे केवळ आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ आपल्याला देत असतात. जीवनात वाईट कर्म जाणाऱ्या व्यक्तीला शनी देवाच्या प्रकोपचा सामना करावा लागतो, आणि त्यामुळे जर तुम्हाला शनी देवांची कृपा प्राप्त करायची असेल, त्यांना प्रसन्न करायचे असेल तर शनिवारचा दिवस हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.
या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्यावर केवळ शनी देवांची कृपाच होत नाही तर सर्व प्रकारच्या संकटांचा देखील नाश होतो. चला तर मग जाणून घेऊ शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी आपण कोणते विशेष उपाय करू शकतो.
मित्रांनो शनी देवाचा कोप असल्यास व्यतिगत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच ज्यांच्यावर शनी देवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. मित्रांनो तुमच्या कुंडलीत जर शनी देवांची साडेसाती असेल, महादशा असेल, ढय्य असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशामध्ये अडथळे निर्माण होतात. आणि या पासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण पुढील काही उपाय नक्की करावेत.
शनी देवांचा कोप टाळण्यासाठी बजरंगबलीला श्री हनुमानांना शनिवारच्या दिवशी सिंदूर आणि चमेली अर्पण करावी, असे मानले जाते की हनुमान चालीसेचे पठण केल्याने सुद्धा शनिदेवांचा कोप टाळता येतो. इतकेच नाही तर हनुमानांची पूजा केल्याने देखील शनी देवाच्या छळाचा सामना करावा लागत नाही.
मित्रांनो शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी नियमितपणे पिंपळावर जल अर्पण करावे, पिंपळाची पूजा करावी व त्या झाडाला ७ वेळा प्रदक्षण घालावी. शक्य असेल तर या दिवशी गरिबांना काळे तीळ, काळे उडीद, काळ्या रंगाची कपडे दान करावी यामुळे देखील शनी देव प्रसन्न होतात. याशिवाय शनिवारी तेल दान करणे देखील अतिउत्तम मानले जाते, यासाठी प्रथम अंघोळ करून तेलाच्या भांड्यात आपला चेहरा पहावा…!
लक्षात घ्या की या उपायसाठी मोहरीचे तेल वापरावे, या मोहरीच्या तेलामध्ये स्वतःचा चेहरा पाहून ते तेल गरजू व्यक्तींना दान करावे. यामुळे देखील शनी दोषापासून मुक्ती मिळते, आपल्या जीवनातील दुःख, संकटे यांचा नाश होतो. आपले नशीब आपल्याला साथ देऊ लागत. त्यानंतर जर तुमच्या जीवनात काही धन संबंधित समस्या असतील.. घरात पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, धन प्राप्ती होत नसेल तर अशा वेळी शनिवारी सूर्यास्ताच्या नंतर एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा…!
लक्षात ठेवा झाडाला अजिबात स्पर्श कराचे नाही.. व तो दिवा लावल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात, घरात आलेला पैसा टिकून राहतो, आणि धन प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतात. तर मित्रांनो कुंडलीतील शनी प्रकोप कमी करण्यासाठी व शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी हे काही उपाय नक्की करून पाहा, आजची माहिती आवडली असेल तर आमच्या पेजला नक्की लाईक करा.
Recent Comments