शनी देव यांना कर्मफल दाता का म्हटले जाते? या लोकांवर शनि देवांची कृपा नेहमी असते जाणून घ्या महत्त्वाची माहिती !

आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा प्रामुख्याने केली जाते. या धर्मामध्ये प्रत्येक देव आणि देवी यांचे एक स्वतंत्र महत्त्व आहे. स्वतंत्र ओळख आहे आणि प्रत्येक देवी देवता यांच्या ओळखीनुसार त्यांची पूजा देखील केली जाते. प्रत्येक देवी देवता यांची पूजा करताना आपल्याला काही विशेष नियमावलीचे पालन देखील करणे अत्यंत गरजेचे ठरते. श्री शनिदेव यांच्या बद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ग्रह मालेमध्ये शनी नावाचा ग्रह देखील आहे आणि म्हणूनच हा ग्रह शनिदेव यांना समर्पित केलेला ग्रह आहे, जसे ज्योतिष शास्त्रांमध्ये शनी ग्रहाचे एक वेगळे महत्त्व आहे त्याचबरोबर देवी देवतांमध्ये देखील श्री शनि देवांचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. श्री शनिदेव आपल्या प्रत्येक कार्यावर नजर ठेवत असतात.

जर आपले कार्य चांगले असतील तर शनिदेव आपल्याला त्या कार्याचे शुभ फळ प्रदान करत असतात. जर आपले कार्य वाईट असतील तर शनिदेव आपल्याला वाईट फळ देत असतात आणि म्हणूनच शनि देवांना कर्मफलताता असे म्हटले जाते आणि म्हणजेच आपल्या कार्यानुसार फळाची गुणवत्ता तसेच आपल्याला कार्यानुसार त्याचे लाभ उपलब्ध करून देणारे म्हणजेच कर्मफल दाता होय. तुम्ही तर चांगले कर्म करत असाल तर तुमच्यामुळे श्री शनिदेव यांची चांगली दृष्टी राहते परंतु जर तुम्ही वाईट काम करत असाल, इतरांना त्रास देत असाल तर शनिदेव तुमच्या पाठी लागले समजा आणि म्हणून शनि देवांचे वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये असे वाटत असेल तर शनिदेव यांना नेहमी शरण जा. चांगली सत्कर्म करा. गरिबांना अनेक वस्तू दान करा. तुम्हाला ज्या वस्तूंची गरज नाही अशा वस्तू दान न करता समोरच्या व्यक्तीला कोणत्या वस्तूंची गरज आहे ते ओळखून त्या वस्तूला दान करत जा. ज्या व्यक्ती विशेष दिवस सोडून नखे कापत असतात.

आपले शारीरिक स्वच्छता ठेवत असतात अशा व्यक्तींवर शनिदेव प्रसन्न होत असतात याचाच अर्थ शनिदेवांना स्वच्छता प्रिय आहे, म्हणून नेहमी स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा. जी व्यक्ती नेहमी अस्वच्छ राहते, घाणेरडी राहते. मळके कपडे परिधान करते अशी व्यक्ती शनिदेवांना अजिबात आवडत नाही. जी व्यक्ती कुत्र्याला रोज चपाती खाऊ घालते अशा व्यक्तीवर देखील शनिदेव प्रसन्न होत असतात, त्याचबरोबर जर तुम्ही शनिवारचा दिवस हा उपवास म्हणून पकडत असाल तर असे करणे तुमच्यासाठी चांगले आहे. जी व्यक्ती शनिवारच्या दिवशी शनि देवाची पूजा आराधना करते अशा व्यक्तींवर शनिदेव नेहमी प्रसन्न होत असतात. असे केल्यामुळे तुमच्यावर कोणतेही प्रकारचे संकट जर आले तर ते संकट दूर करण्याची क्षमता शनिदेव आपल्याला देत असतात त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जी व्यक्ती एक दिवा प्रज्वलित करते त्या व्यक्तीवर शनिदेव नेहमी प्रसन्न होतात.

जी व्यक्ती नेहमी रुद्राक्षाची माळा परिधान करते अशी व्यक्ती शनी देवांना प्रिय असते. जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांची नियमितपणे सेवा करते त्यांच्यावर प्रेम करते अशा व्यक्ती व शनिदेव नेहमी प्रसन्न होत असतात, जीव लावत असतात व तुमच्यावर कोणतेही प्रकारचे संकट आले तर त्या संकटातून दूर करत असतात. आता तुम्हाला एक कल्पना तर आली असेल की जी व्यक्ती नेहमी स्वच्छ राहते जी व्यक्ती कोणाचा अपमान करत नाही, कुणाला त्रास देत नाही अशा व्यक्ती सोबत शनि देव नेहमी राहतात शनिदेव अशा व्यक्तींवर नेहमी कृपादृष्टी चा वर्षाव करत असतात.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *