श्रावण महिन्यात चुकूनही सूर्यास्तानंतर ही ‘पाच’ कामे करू नका, देवाधिदेव महादेव होतील क्रोधीत.

नमस्कार,

मित्रांनो सूर्यास्तानंतर काही कामे कधीच करू नयेत. या कामांमुळे घरातील सुखशांती तर जातेच पण दरिद्री सुद्धा येते. आपण अशी कामे न जाणते पणामुळे चटकन करून टाकतो. आजपासून पुढे ही कामे पुन्हा करू नका. सूर्यास्तानंतर काही कामे अशी असतात जी केल्याने ‘देवी महालक्ष्मी’ लगेच प्रसन्न होतात.

ही आहेत ती पाच कामे-
१. सूर्यास्तावेळी कधीही पलंगाशी खेटून बसू नये. या गोष्टीला मृत्यूशोक मानण्यात येतो. सुर्यास्तावेळी घरात कधीच रडू नये, यालादेखील मृत्यूचे कारण मानले जाते. सूर्यास्तानंतर घरात ठेवलेली दही कधीच कोणाला देऊ नये. दहिला शुक्र ग्रहासंबंधीत असलेला खास पदार्थ मानले जाते. शुक्राला सुखसमृद्धीचा ग्रह मानले जाते म्हणूनच सुर्यास्तावेळी किंवा सूर्यास्तानंतर आपल्या घरातील सुखसमृद्धी बाहेर जाऊ नये म्हणून त्यावेळे नंतर कोणालाही दही देऊ नये. त्याचबरोबर सूर्यास्तानंतर घरातील कोणतीही वस्तू शेजारीपाजारी देऊ नये, याने देवी महालक्ष्मी देखील नाराज होतात.

२. सूर्यास्त होत असताना झोपू नये आणि त्याचबरोबर जेवण देखील करू नये. असे केल्यास आपले आरोग्य खालावते तर दुसरीकडे घरात पैसा येण्यास अडचण निर्माण होते. असे म्हणतात की, सुर्यास्तावेळी जो झोपतो, तो स्वतःसोबत स्वतःचे भाग्य घेऊन झोपतो. याच वेळेत कर्ज देणारा आणि घेणारा दोघेही दुःखी राहतात.

३. सूर्यास्त झाल्यानंतर जर तुम्ही घरात केरकचरा करत असाल तर वेळीच सावध व्हा. असे केल्याने घरातील धनवैभव कायमचे निघून जाते. सूर्यास्तानंतर घरात झाडू मारल्याने ‘देवी लक्ष्मी’ नाराज होऊन कायमच्या निघून जातात आणि आपण आपल्या नशिबावर रडत बसतो.

४.बऱ्याचदा लोकं, सूर्यास्तानंतर केस व नखे कापतात, जे खर तर शास्त्रानुसार आणि विज्ञानानुसार देखील चुकीचे आहे. जर तुम्हाला ही सवय असेल तर ताबडतोब सोडून द्या. असे केल्यास जीवनात नकारात्मक विचारांचे काहूर माजते आणि आरोग्य व पैशावर प्रभाव पडतो. सुर्यास्तावेळी खाटेवर किंवा पलंगावर बसल्यावर पाय खाली मोकळे सोडून हलवले नाही पाहिजेत.

५. सूर्यास्तानंतर कधीही तुळशीच्या पानांना स्पर्श देखील करू नये. त्याचबरोबर कधीही सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी घालू नये. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घरात पूजापाठ किंवा दिवावात करायला हवी. सूर्यास्तानंतर अंधारामुळे भूत प्रेते व अनेक नकारात्मक शक्तींचा वावर आपल्या आजूबाजूला वास करत असतो. सुर्यास्तावेळी कधी संभोग करू नये, देवी महालक्ष्मी अशा घरांची घृणा करतात.

वरील पाच कामे कधीही सूर्यास्तानंतर किंवा सुर्यास्तावेळी करू नयेत. भगवान महादेव व देवी महालक्ष्मी यांची घरातील कृपा कायमची निघून जाते तर घरात कायम आरोग्य संबंधित समस्या उद्भवतात. हे काम न केल्याने चांगले होते.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *