सर्वपित्री आमावस्याच्या दिवशी चुकून ही करु नका ही कामे, नाहीतर पितर आपल्यावर नाराज होतील आणि जीवनात खुप नुकसान होईल…..
पंचांगशास्त्रानुसार ६ ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावश्या आहे. सर्व पित्री अमावश्या हा पितृ पक्ष पंधरवाडामधील शेवटचा दिवस असतो. ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्युची तिथी माहीती नसते ,ती लोक या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करु शकतात.या दिवशी आपण त्यांच्यासाठी तर्पण करु शकता, पिंडदान करु शकता जेणेकरून आपल्या पितरांच्या आत्माला शांती मिळू शकते.
यादिवशी पित्तरांना नावाने तर्पण विधी करून त्यांना अन्न आणि जल अर्पण केले जाते. यादिवशी आपण आपल्या कडून चुकीने घडलेल्या कर्मांची क्षमा याचना करावी.
पंचांगशास्त्रानुसार या दिवशी काही कामे कटाकक्षाने टाळावे. ही कामे या दिवशी वर्ज्य मानले जाते. पण जर आपण ही कामे केली तर , आपल्या राशिमध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ज्यांच्या राशीमध्ये पितृदोष निर्माण होतो त्यांच्या जीवनात नवनवीन समस्या निर्माण होत असतात, घरात वाद आणि तंटे निर्माण होतात. घरात सुख-शांती राहत नाही. घरामध्ये पैसा टिकत नाही. त्यामुळे या दिवशी आम्ही सांगितलेली कामे अजिबात करु नका.
पंचांगशास्त्रानुसार पितृअमावश्येला श्राद्ध केल्यास आपले पूर्वज तृप्त होतात आणि यामुळे आपल्या जीवनात सुख-शांती नांदते. परंतु जर आपण कोणतेही चांगले कार्याची सुरुवात काही नियम पाळून केली तर ते अधिक फायदेशीर ठरतात. तर सगळ्यात पहिला नियम आहे , श्राद्ध करतांना ते कधीही दुसऱ्याच्या घरी किंवा जाग्यावर करु नका. आपण आपल्या राहत्या घरीच श्राद्ध करावे.
परंतु तरीदेखील जर आपल्याला आपल्या राहत्या घरी श्राद्ध करने जमत नसेल तर आपण एखाद्या पवित्र ठिकाणी जसे की नदीच्या काठावर जाऊन करावे. दूसरा नियम म्हणजे, श्राद्धमध्ये सर्वप्रथम अग्निला नैवेद्य अर्पण करावे आणि त्यानंतर पित्तरांना पिंडदान अर्पण करावे. तीसरा नियम म्हणजे, श्राद्ध कधीही सूर्यास्तानंतर करु नये. सूर्यास्तानंतर पित्तर आपले नैवेद्य स्वीकार करत नाही.
साधारणपणे दुपारी १२ नंतर आणि सूर्यास्ताच्या आधी श्राद्ध करावा. चौथा नियम म्हणजे, आपण कावळा, कुत्रा आणि गायीसाठी जे नैवेद्य काढतो ते नैवेद्य त्याच जनावराला भेटेल याची काळजी घ्यावी. कुत्र्याचा नैवेद्य कुत्र्याला, कावळ्याच कावळ्याला आणि गायीच नैवेद्य गायीला भेटेल याची विशेष काळजी घ्यावी.
Recent Comments