सोमवारच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी.
ज्योतिषशास्त्रानुसार या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा संबंध आपल्याशी जोडला जातो. आठवड्यातील सात वारांची नावेदेखील ग्रहांच्या नावांवरून ठेवलेली आहेत. प्रत्येक वाराचा संबंध कुठल्या न कुठल्या देवतेच्या उपासनेशी आहे. ज्या देवाचा वार असतो, त्यादिवशी त्या देवतेची शक्ती अधिक सक्रिय असते. जर आपण त्या देवतांशी संबंधित नियमांचे पालन केले तर याचा आपला जीवनावर वेगळा प्रभाव पडतो. म्हणूनच आपण हे समजून घ्यायला हवं की, कोणत्या दिवशी कोणत्या देवतेची उपासना केली पाहिजे. कोणते काम केले पाहिजे आणि कोणते नाही. आज आपण सोमवारच्या दिवशी कोणती कामे करायला हवी, हे जाणून घेणार आहोत.
१. आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार भगवान महादेवाचा वार मानला जातो. तसेच या दिवसाचा अधिपती सोम म्हणजेच चंद्राला सुद्धा मानले जाते, म्हणूनच या दिवसाला सोमवार म्हटले जाते. सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि चंद्र दोघांचीही पूजा केली जाते. वैवाहिक जीवन सुखकर होवो अथवा चांगला पती मिळावा यासाठी मुली विशेष पूजा करतात.
२. सोमवारच्या दिवशी त्या सर्व गोष्टी करायला हव्यात ज्या भगवान शंकराला प्रिय आहेत. शिवमंदिरात जाऊन गंगाजल अर्पण करायला हवे. त्याचबरोबर भगवान शिवजींना प्रिय असलेले बेलपत्र नक्कीच अर्पण करायला हवे. शिवलिंगाला चंदनाचा लेप लावायला हवा त्याचबरोबर रात्री चंद्राला अर्ध्य करायला हवे.
३. भगवान शंकराना पांढऱ्या वस्तू अतिशय प्रिय असतात त्यामुळे सोमवारच्या दिवशी पांढरी कपडे परिधान करावीत. त्याचबरोबर भगवान शंकराना दूध व दही अर्पण करावे.
४. सोमवारच्या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना आरसा नक्की पहावा.
आता पाहूया काही अशी कामे जी सोमवारच्या दिवशी नाही केली पाहिजेत.
१. सोमवारच्या दिवशी कधीही मांसाहारी जेवण करू नये.
२. सोमवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे कधीही परिधान करू नयेत.
३. सोमवारी कोणाचाही अपमान करू नये त्याचबरोबर कोणालाही शिवीगाळ करू नये.
४. सोमवारच्या दिवशी नंदी बैलाचा अपमान करू नये. याउलट महादेवाच्या पूजेसोबत नंदीची देखील पूजा करावी.
Recent Comments