स्त्रियांनी हनुमान चालीस वाचावे किंवा वाचू नये जाणून घ्या होणारे शुभ व अशुभ परिणाम ?

मित्रांनो हिंदू धर्म संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व देण्यात आलेले आहेत. या धर्मामध्ये विविध ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. या ग्रंथांमुळे मानवी जीवनातील अनेक मूल्य व्यवस्थित रित्या कार्य करण्यासाठी मदत होऊ लागली आहे. ग्रंथांच्या मदतीने मनुष्य आपले जीवन समृद्ध करत असतो. ग्रंथांमध्ये लिहिलेले नियम, माहिती आणि सूत्रांच्या आधारे आपल्या जीवनातील अनेक व्याधी बाधा दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, समुद्र शास्त्र या सर्वांचे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एक वेगळीच महत्त्व आहे. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या ग्रंथाबद्दल सांगणार आहोत तो ग्रंथ म्हणजे हनुमान चालीसा, यालाच आपण मराठीमध्ये मारुती स्तोत्र असे म्हणतो. या सूत्रामध्ये श्रीराम आणि हनुमान यांच्या बद्दल वर्णन केले गेलेले आहे तसेच हनुमानजी यांची पूजा विधी व गुणगान या हनुमान चालीसा मध्ये करण्यात आलेली आहे. जो व्यक्ती हनुमानजी यांना शरण जातो त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख निर्माण होत नाही.

आपल्या सर्वांना बजरंग बली माहिती आहेत. बजरंग बली संकट तारक आहे. संकटमोचक आहे आणि म्हणूनच बजरंग बली आपल्या भक्तांना नेहमी सुखी देत असतात. बजरंगबली श्रीराम भक्त आहेत आणि म्हणूनच जो व्यक्ती श्रीराम यांची पूजा करतो त्यांच्या जीवनामध्ये देखील सुख शांती निर्माण होत असते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला हनुमान चालीसा स्त्रियांनी वाचायला हवी किंवा नाही? याबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, असे करणे शुभ असते की अशुभ याबद्दल देखील सांगणार आहोत आणि म्हणूनच आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे हनुमान चालीसाचे पठण करतात. हनुमान चालीसा आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश करत असतात परंतु हनुमान चालीसा पाठवून करत असताना आजूबाजूला अनेक गोष्टी देखील आपल्या कानावर पडत असतात, ते म्हणजे महिलांनी याचे वाचन करायला हवे की नाही? हो, तुमच्या आजूबाजूला देखील अशा गप्पा घडताना तुम्ही पाहिल्या असतील.

जी व्यक्ती हनुमान चालीसा नियमितपणे पठण करते त्या व्यक्तीला जीवनामध्ये खूप फायदे होतात. जर तुम्हाला वारंवार घाबरल्यासारखे होत असेल, एखाद्या गोष्टीची भीती नेहमी जाणवत असेल, जीवनामध्ये वारंवार संकट येत असेल, आजूबाजूला नेहमी नकारात्मक परिस्थिती निर्माण होत असेल तर अशावेळी तज्ञ मंडळी म्हणजेच आपल्या घरातील जेष्ठ नागरिक असतात त्यांच्याकडून आपल्याला हनुमान चालीसाचे पठण करण्याचा सल्ला दिला जातो. हनुमान चालीसाचे पठण केल्याने आपल्या मनातील सगळी भीती दूर होऊन जाते. आपण साहसी बनतो तसेच बजरंगबली आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्या जीवनातील संकटांचा नाश देखील करतात. आपल्या आजूबाजूला अनेक जण महिलांनी हनुमान चालीसा वाचू नये असे म्हणत असतात परंतु असे नाही. तुम्हा सर्वांना माहिती असेल की साक्षात बजरंगबली यांनी अशोक वाटिका मध्ये जाऊन सीतामाता यांची सुटका केली होती तसेच श्रीराम व माता सीता यांचे मिलन देखील घडवले होते.

मान्य आहे की बजरंगबली ब्रह्मचारी आहेत परंतु महिलांनी हनुमान चालीसा याचे वाचन करणे असे म्हणने चुकीचे आहे. हनुमान चालीसा मध्ये स्वतः असे म्हटले गेले आहे की जो कोणी हनुमान चालीसा वाचेल त्याची सर्व दुःख बजरंग बली दूर करतील आणि म्हणूनच स्त्री, पुरुष, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असा कोणताही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येकाने हनुमान चालीसा पठण करायला हवे. हनुमान चालीसा पठण केल्याने मनुष्याचे सर्व दुःख दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीला शनी पीडा राहू केतू पिडा असेल किंवा भयानक स्वप्न पडत असतील तर अशावेळी प्रत्येक व्यक्तींनी हनुमान चालीसाचे पठण करायला हवे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक काळ सुरू होईल अशा प्रकारे प्रत्येकाने हनुमान चालीसा पठण आवश्य करायला हवे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *