स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या 2 वस्तू घरात लक्ष्मी नांदू लागेल

तवा हा तंत्र-मंत्र शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. या तव्यावर अनेक तोडके आणि तांत्रिक उपाय केले जातात, आपल्या घरातील तवा आपण कधीच इतर कोणालाही वापरायला देऊ नका सोबतच तवा खरकटा ठेवणे, अस्वच्छ ठेवणे किंवा खरकाट्या भांड्यात तवा टाकने, या गोष्टीसुद्धा आपण टाळायला हव्या, कारण आपल्या घरातील तवा जर दीर्घकाळ खरकटा राहत असेल तर त्यामुळे पितृ दोष उद्भवतात, सोबतच घरांमध्ये गरिबी आणि दरिद्रता येऊ शकते.

मित्रांनो तवा हा आपण स्वतः स्वच्छ करावा जी गृहिणी आहे ही गृहलक्ष्मी आहे. तिने स्वतः आपल्या हाताने तो धुवायला हवा, हा तवा घराबाहेरील व्यक्तींच्या दृष्टीस पडणार नाही, नजरेस पडणार नाही, याची काळजी आपण घ्या, तवा नेहमी गॅस शेगडीच्या किंवा तुम्ही ज्यावर स्वयंपाक करता चूल असेल गॅस शेगडी असेल तर त्याच्यावर नेहमी उजव्या बाजूला आपण ठेवायला हवा, डावीकडे ठेवल्यास त्यामुळे घरात अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात…!

तवा पालथा कधीच घालू नये, मात्र जर तुम्ही एखादा उपाय करत असाल, एखादा तू टोटका करत असाल त्यावेळी मात्र तोटका करण्यापुरता आपण तवा पालथा घालू शकता. तव्याशी संबंधीत एक अत्यंत प्रभावशाली धनप्राप्ती चा हा उपाय जर आपण नित्यनियमाने काही दिवस केला तर घरात धनधान्याच्या राशी लागतात घर धनधान्याने परिपूर्ण बनते. माता लक्ष्मीची असीम कृपा बरसते, यासाठी आपण दोन पदार्थांचा या ठिकाणी वापर करत आहोत हे दोन्ही पदार्थ आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात..
यातील पहिला पदार्थ म्हणजे हळद…! ही हळद लक्ष्मिकृपा माण्यात आलेली आहे. मित्रानो एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्या बरोबर या ठिकाणी सामायिक करतोय आपल्या घरातील तीन वस्तू या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पहिली गोष्ट झाडू, दुसरी गोष्ट सूप.. अनेकजण वापरत नाहीत मात्र तुमच्या घरात ती असेल तर झाडू, सूप आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाटा-वरवंटा…! या तीन गोष्टी माता लक्ष्मीची थेट संबंधित आहेत.

जर तुमच्या घरामध्ये या वस्तू असतील, तर झाडू हा कधीच उभा करून ठेवू नका. माता लक्ष्मी दररोज रात्री येते आणि झाडू वरती उभी राहते सुपावरती बसते, आणि पाटा-वरवंटा वर आराम करते. ज्या घरात पाटा-वरवंटा रात्रीच्या वेळी भिंतीला उभा करून ठेवला जातो त्या घराची प्रगती कधीच होत नाही. पाटा-वरवंटा नेहमी साफ स्वच्छ असावा आणि रात्री तो आपण उभा करून ठेवू नये..

सोबतच या तिन्ही वस्तूंना हळदीचा छोटासा टिळक नक्की करा, म्हणजे पाण्यामध्ये हळद मिक्स करून अगदी एक जरी आपण ठिपका या तिन्ही वस्तू वरती किंवा या झाडू ला एक हळदीचे पाणी करून त्यामध्ये एखादे सूत किंवा धागा दोरा व्यवस्थित गुंडळून जर तो धागा तीन वेळा जर त्याला गुंडाळला सु्पावरती हळदीचा तिलक केला. पाटा-वरवंटा ला हळदीचा तिलक दररोज केला तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदु लागते, लक्ष्मी पाणी भरू लागते हा उपाय अगदी अवश्य करून पाहा .

तव्याविषयी चा जो उपाय आहे. त्यासाठी आपल्याला हळद आवश्यक आहे. हळद आणि थोडसे तूप हे तूप अर्थातच गोमाते असावे गाईचे असावे, नसेल गाईचे तर तुम्ही म्हशीचे सुद्धा वापरू शकता. किंवा इतर पशू सुद्धा चालते, कारण ज्यामध्ये हळद टाकली जाते, ती वस्तू शुद्ध बनते, तिचे शुद्धीकरण आपोआपच घडून येते . मित्रानो तूप घरामध्ये ऐश्वर्या वैभव आणते. अगदी प्राचीन मान्यता आहे, तर या दोन वस्तू आपण एकत्र करायचे आहे त्याचा व्यवस्थित गोल बनवायचा आहे.

घरातील लक्ष्मी जी स्त्री आहे तिचा कधीच अपमान करू नका, ती घराची लक्ष्मी आहे तर महिलांनी हा उपाय करायचा आहे. महिला नसतील तर पुरुष सुद्धा हा उपाय करू शकतात, हळद आणि तूप एकत्र करून दररोज सकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी तव्यावरती या हळदीने आपण 3 तिलक करायचे आहेत. टिपके काढायचे आहेत तीन ठिपके काढायचे आहे.

बस कोणताही मंत्र म्हणायचा नाही काही नाही तीन टिपके काढल्यानंतर आपण आपल्या हाताने हे तिन्हीही टिपके तव्यावरती चोळायचे पाच मिनिट वेट करा. व्यवस्थित पाच मिनिटं तर हे तिन्ही टिपके व्यवस्थित त्या तव्यावरची चोळून घ्या. त्यानंतर हा तवा अन्न तयार करण्यासाठी म्हणजे चपाती असेल, भाजी असेल किंवा तुम्हांला जे काही जेवण करायचा आहे. त्यासाठी आपण तो वापरायचा आहे.

मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही नॉनव्हेज करणार असाल, तर हा उपाय कृपया त्या दिवशी करणे टाळा. ही गोष्ट मात्र आपण आवर्जून लक्षात ठेवायची आहे, अन्यथा त्यांचे उलटे प्रभाव उलटे परिणाम हे प्राप्त होऊ शकतात…! मित्रांनो आम्ही जे उपाय तुम्हाला सांगत असतो, हे उपाय करताना नेहमी आपल्या कर्मावरती लक्ष ठेवा आपले कर्म आपण प्रामाणिकपणे करा.. कोणत्याही गोर गरीबावर अन्याय करने एखाद्याची हाई घेणे, बद्दुआ घेणे, कोणाचाही अपमान करणं कोणाची थट्टा करणे या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळा कर्म करत राहा आणि कर्म करताना या छोटे छोटे तोडगे उपाय आहेत. तेही करा आपली प्रगतीमध्ये बरकत ही झाल्याशिवाय राहणार नाही.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *