स्वयंपाक घरातील या वस्तूवर कुंकवाने काढा स्वस्तिक, आर्थिक प्रगती होईल. पैसा मिळेल
ओम नमः शिवाय!!
स्वयंपाक घरातील या एका वस्तूवर स्वस्तिक काढल्यास आपल्या घरात पैसे येतील. आपल्या सर्व आर्थिक समस्या लगोलग दूर होतील. बऱ्याच मित्रांचा या गोष्टीवर विश्वास नसतो परंतु काही गोष्टी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होतो.
आपलं हे काम होणारच आहे, अस मनात धरून काम केल्यास नक्कीच कामे पूर्ण होतात. आपल्या मनात अशी कामे करताना कोणतीही शंका आल्यास आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून पूर्ण श्रद्धा ठेवूनच ही कामे करावीत. हे उपाय करताना कोणाकडेही त्याची वाच्यता करू नये. जेवढ्या गुप्तपणे आपण हे उपाय करू तितकाच अधिक फायदा आपल्याला या उपायांचा होतो. जाणून घेऊया, उद्या कोणता विशेष उपाय करायचा आहे.
आपल्या घरातील तीन वस्तू खूप महत्वाच्या असतात. या तीन वस्तूंमध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करत असतात. यामध्ये झाडू, धान्य पाखडण्याचे सूप आणि पाटा वरवंटा याचा समावेश होतो. अस मानलं जातं की, जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन करते त्यावेळी सर्वप्रथम झाडूवर उभी राहते, सुपावर झोपते आणि पाट्या वरवंट्यावर शयन करते. त्यामुळे या वस्तू कधीही उलट्या किंवा उभ्या ठेवू नयेत तर अश्या ठेवाव्यात ज्याने माता लक्ष्मी त्यावर बसू शकेल किंवा उभी राहू शकेल.
या तिन्ही गोष्टींपैकी सुपाची दर शुक्रवारी हळद कुंकू आणि अक्षदा टाकून पूजा करावी. या सुपावर कुंकवाने एक स्वस्तिक काढावे. स्वस्तिक काढल्यावर मूठभर गहू सुपात ठेवावेत. काही वेळासाठी हे गहू सुपातच राहू द्यायचे आहेत आणि एक तासानंतर हे गहू आपण गोमातेला चारायचे आहेत.
हा प्रयोग केल्यावर आपल्या चारित्र्यावर लागलेला कलंक निघून जाईल. समाजात आपला मानसन्मान वाढेल. आपले नशीब चमकू लागेल आणि आपल्या नशिबाला सौभाग्याची साथ मिळेल. हा उपाय आपण प्रत्येक शुक्रवारी करून पाहा.
Recent Comments