स्वामींचा पहिला फोटो काढताना घडलेला हा प्रसंग तुम्हाला माहित आहे का?
नमस्कार,
“श्री स्वामी समर्थ” स्वामी भक्त श्री स्वामी महाराजांचा पहिला फोटो ज्या कंपनीने काढला ती कंपनी होती कोडक. आणि ज्या फोटोग्राफरने हा फोटो काढला तो साधारण इसवी सन १८५५ ते १८७० च्या दरम्यान हा फोटो काढण्यात आला. जा फोटोग्राफरने स्वामींचा हा पहिला फोटो काढला त्याला त्या वेळेस खूप वेगळा अनुभव आला होता. त्यावरील कथा खूप रोचक आहेत आणि ती कथा तुम्हाला नक्कीच आवडेल.
स्वामी महाराजांचा पहिला फोटो काढताना फोटोग्राफर जॉर्ज यांना आलेला पहिला अनुभव. जॉर्ज अस्थमण या युरोपियन फोटोग्राफरला स्वामींचा पहिला फोटो काढायचा मान दिला. कोडक या कंपनीला त्यांच्या प्रसिद्धीसाठी काही जगप्रसिद्ध व्यक्तींचे फोटो हवे होते. त्यासाठी ते स्वामी महाराजांचे फोटो काढण्याचे ठरवतात आणि अक्कलकोटला येतात कारण त्या काळात महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि चमत्कारांच्या कथा मुंबई वृत्तपत्रात छापून येतात. तसेच ब्रिटिश सरकारने महाराजांची काळजी घेण्याचे आदेश दिले होते.
तेव्हा जॉर्ज फोटोग्राफर अक्कलकोटला आला. केवळ त्याने आपली आपली स्वामीभक्तां समोर मांडली. तेव्हा भक्तांनी त्याला असे सांगितले, जर महाराजांचे फोटो काढायचे असतील तर त्यांची परवानगी घ्यावी लागेल. पण जॉर्ज फोटोग्राफरने ठरवले जी महाराजांचे परवानगी न घेता त्यांच्या नकळत त्यांचे फोटो काढायचे.
फोटोग्राफरने कोणाला कळणार नाही अशा अतिशय चलाखीने आणि हुशारीने फोटो काढले. जॉर्ज यांचे म्हणणं होतं की कॅमेरा एक प्रकाशन आहे. आणि त्यावर चमत्कार होणे अशक्य आहे. नंतर महाराजांची परवानगी न घेता फोटोग्राफरने काढलेल्या फोटोची प्रत महाराजांसमोर ठेवली आणि महाराजांची प्रतिक्रिया मागितली. महाराजांनी ती प्रत न पाहता आपल्या भक्तांच्या हातात दिली. आणि विचारले की सांगा तुम्हाला यात काय दिसते? त्यांनी पाहिले,
पहिले भक्त म्हणाला की यात खंडोबा देवाचे अतिशय सुंदर रूप आहे. दुसरे भक्त म्हणाले की यात रामाचे अतिशय सुंदर स्वरूप आहे. तिसरे भक्त म्हणाले की आत मला अंबाबाईचे नेत्र दीपक दर्शन घडते. त्यानंतर प्रत्येक भक्ताला आपल्या कुलदेवतेचे दर्शन घडत जाते. पण कोणीही असं म्हणत नाही की हा फोटो स्वामी महाराजांचा आहे. जॉर्ज फोटोग्राफर ना हे बघून हसू येत होतं. आणि ते म्हणाले तुम्हाला तुमच्या गुरूंचा फोटो ओळखता येत नाही. जॉर्ज फोटोग्राफरने तो फोटो महाराजांचा हातात दिला आणि सांगितले सांगा बघु महाराज यात कोण आहे? स्वामिंनी तो फोटो हातात घेतला आणि जोरजोरात हसू लागले.
महाराज जॉर्जला म्हणाले अरे हा माझा फोटो वेड्या मी असा दिसतो? स्वामिंनी तो फोटो परत जॉर्ज च्या हातात दिला. जॉर्ज फोटोग्राफर ला फोटो पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. मी तर स्वामींचा फोटो काढला आता या प्रतीवर माकड कसे काय आले? नंतर त्या फोटोग्राफरला त्याची चूक कळाली. त्यांनी स्वामींची परवानगी न घेता त्यांचा फोटो काढला. त्यांनी लगेच स्वामींच्या चरणी माफी मागितली.
त्यांनी कबूल केले की अध्यात्माशिवाय विज्ञानाला अर्थ नाही. जॉर्ज यांनी महाराजांना विनंती केली की आमची कंपनी नवीन आहे आम्हाला भारतातील सर्व संतांचे फोटो काढायचे आहेत. यासाठी मला खास युरोप वरून बोलवण्यात आले आहे. आपला फोटो काढण्याची मला संधी द्या कारण तुमचा फोटो घराघरात पोहोचेल. त्यांची प्रामाणिक विनंती एकूण स्वामिनी फोटो काढण्यास परवानगी दिली आणि सांगितले की माझाच नाही तर माझा भक्तांचा ही फोटो काढ.
त्यानंतर फडके नावाचे एक भक्त आहेत ते स्वामींकडे विनंती करतात की मला आपला एक फोटो काढता येईल का? महाराज त्यांना होकार देतात आणि सायंकाळी पाच वाजता फोटो काढण्यास बोलावतात. फडके बरोबर पाच वाजता येतात. महाराज त्यांच्या हातात धोका देतात आणि तो चालू ठेवायला सांगतात बघता बघता सायंकाळचे सात वाजतात स्वामी फडकेंना म्हणतात की आता फोटो काढ. फडके स्वामींना म्हणतात की अशा अंधारात कमी प्रकाशात फोटो व्यवस्थित येणार नाही महाराज फडक्यांना सांगतात की तुम्ही फोटो काढा व्यवस्थितच येईल. आणि तसंच घडलं. स्वामीभक्तहो या फोटो बरोबरच ही दिव्य लीला याठिकाणी समाप्त होत आहे.
Recent Comments