स्वामी शक्ती कशी ओळखावी?, तुम्हाला देखील हे संकेत मिळत असतील तर समजून जा की तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती आहे..

नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ..!

आज पाहणार आहोत तल स्वामी शक्तीची ओळख.. तुमच्या आजूबाजूला स्वामींची शक्ती आहे का..? व ते कसे ओळखावे..? या बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. मित्रांनो स्वामीची शक्ती तुमच्या आजूबाजूला आहे का ते कसे ओळखावे तर त्यासाठी आम्ही पुढे काही संकेत सांगणार आहोत. जर ते संकेत तुम्हाला दिसत असतील किंवा तुमच्या सोबत त्या घटना घडत असतील तर तुम्ही समजून जा की नक्कीच तुमच्या आजूबाजूला स्वामींची शक्ती आहे म्हणजे स्वामी तुमच्या सोबत आहेत तुमच्या जवळ आहेत. जर तुम्ही नित्य नियमाने सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला देवत्व आहे याची जाणीव हमखास होते. काही साधकांना, सेवेकरांना स्वप्नात स्वामी दृष्टांत देत असतात.

मित्रांनो याचा अर्थ असा होतो की स्वामी शक्ती त्या साधकाला साहाय्य करत आहे किंवा त्याच्या पाठीशी आहे. काही साधकांना अचानक पहाटे जाग येते पण त्यांना समजत नाही की असे का घडते आहे. तर याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती या ब्रम्ह मुहूर्तामध्ये जागृक असतात आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचे असतात. तुम्ही हे वाक्य तर नक्कीच ऐकले असेल “अरे ब्रम्ह समय तू झोपून न राहता उठ आणि माझी आराधना सुरू करून माझ्याकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घे…!” काही साधकांना उपासना करताना अचानक मंद सुगंधाचा वास येतो. मित्रांनो याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती ही आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या साधकाला करून देत असते. काही साधकांना अचानक थंड हवेची झुळूक लागते तर काही साधकांना अचानक अंगावर शहारे येतेत तर काही साधकांना आजूबाजूला कोणी तरी आहे असा सतत भास होत असतो. तर काही साधकांना देवघरातील दक्षिणवृत्ती शंक हल्ल्याची जाणीव होतो, याचा अर्थ स्वामी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे आणि ती आपल्या उपासनेला साहाय्य करत आहे. हे अनुभव उपवास करणाऱ्या अनेक साधकांना येत असतात पण त्यांना या गोष्टी उमजत नाहीत.

जर असे अनुभव कोणाला येत असतील तर त्यांची उपासना उत्तम आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. या स्वामी शक्तीला आपण कश्या तरेन अनुकूल करून घ्यावे हे देखील आज आम्ही तुम्हाला याच लेखामध्ये सांगणार आहोत. प्रथम साधकांनी आपले चरित्र स्वच्छ ठेवावं, जास्तीत जास्त मौन पाळावे शांत राहावं, आपला आहार सात्विक असावा, जास्तीत जास्त जप करावा नामस्मरण करावे, देवपूजा करताना, पारायण करताना, जप-तप करताना आपण स्वतः आसनावर बसावे. आपल्या एका बाजूला आसन ठेवावे त्यावर एक फुल वाहावे म्हणजे आपल्या आजूबाजूला संचारीत असलेले स्वामी शक्तीला आपण मान देऊन तिला आमंत्रित केल्याचे समजले जाते. अचानक पहाटे जाग येणाऱ्या साधकांनी सुचिरबुद्ध होऊन जमल्यास देवपूजा करावी किंवा जपासाठी बसावे. पण आळस न करता अंथरून सोडून ब्रम्ह मुहूर्तावर उपासना करणाऱ्या व्यक्तीला स्वामींचा आशीर्वाद, देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच आणि त्यांची शुभफळ प्राप्ती त्वरित होते.

तर मित्रांनो हे संकेत आहेत स्वामी शक्ती आपल्या सोबत असल्याची…! तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही, हिंदू धर्म शास्त्र व स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेले उपाय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *