हरतालिका व्रत करतांना पाळा हे ७ नियम आणि मिळवा व्रतापासून अनेक लाभ…..
हिंदू धर्मशास्त्रात हरतालिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हरतालिका हे भाद्रपद मध्ये शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जाते.यावर्षी हे सण ९ सितंबर रोजी येणार आहे. हे व्रत माता लक्ष्मी यांनी भगवान महादेव हे पती म्हणून मिळावे यासाठी केले होते. तेव्हापासून या व्रताला सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच स्त्रिया हे व्रत करतात. कुमारी मुलगी आपल्याला मनोवांछिक वर मिळावे यासाठी हे व्रत करतात. तर विवाहित स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात. परंतु हे व्रत करतांना आपल्याला काही नियम पाळावे लागतात, जर आपण हे नियम पाळले तर आपले व्रत सफल होते अन्यथा त्यामध्ये काही न काही बाधा येते.म्हणून आज आम्ही आपल्याला काही नियम सांगणार आहोत, ज्याचे आपल्याला काटेकोरपणे पालन करायचे आहे.
●नियम१) एकदा हा व्रत सुरु केला तर आपल्याला हे व्रत आयुष्यभरासाठी करावे लागते. यामध्ये कधीही खंड पडता कामा नये. परंतु जर आपली तबीयत बिगडली असेल किंवा अन्य कारणास्तव जर आपल्याला हे व्रत थांबवायचे असेल तर मग आपण या व्रताचे विधीपूर्वक उद्यापन करून , हे व्रत दुसऱ्याला द्यायचे आहे.
२) या व्रतामध्ये आपल्याला भगवान शंकर,माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मातीच्या प्रतिकृती स्वतः बनवायच्या आहे आणि त्यांची स्थापना करून त्यांची पूजाकरायची आहे.
३)या व्रताची सुरुवात सकाळी सूर्याला जल अर्पण करून करायची आहे आणि यावेळी आपण मनामध्ये काही तरी संकल्प घ्यायचा आहे.
४)पूजेमध्ये आपण माता गौरी ला जे सौभाग्याचे अलंकार चढावतो. ते अलंकार पूजेनंतर एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरीब महिलेला दान करायचे आहे.
५)यादिवशी रात्री भजन,मंत्रपठन ,गीतगायन तसेच कुमारिका यांनी पार्वती मंगल स्तोत्र पठन करत जागरण केले पाहिजे.
६)व्रताच्या दुसऱ्या दिवशी सर्व नित्यक्रमातून निवृत्त होऊन माता पार्वती आणि भगवान गणेश ची पूजा करायची आणि मग पुजेमधील प्रसाद सर्वांना वाटप करायचे आहे. आणि शेवटी स्वतः प्रसाद ग्रहण करून व्रत संपवायचे आहे.
७)यादिवशी आपल्या घरातील वृद्धांना कुठलेही त्रास द्यायचे नाही. जर यादिवशी आपल्या घरातील वृद्धांना त्रास दिल्या गेले तर आपल्याला या व्रताचे कोणतेही लाभ मिळणार नाही.तर महिलांनी आणि कुमारिका यांनी हरतालिका व्रत करतांना ही सात नियम पाळावी आणि व्रताचे सर्व लाभ मिळवावे.
Recent Comments