हे झाड कधीच सूकू देऊ नका, अन्यथा भिकेल्या रागाला वंश नष्ट होईल !

मित्रांनो आपल्या अवतीभवती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. या वनस्पती आपल्याला अन्न, निवारा देत असतात. या वनस्पतीच्या उपयोगाने मनुष्याने आतापर्यंत खूप प्रगती केलेली आहे. वनस्पती आणि निसर्ग यांनी मनुष्याला भरभरून दिलेले आहे परंतु माणसाने या पक्षात नेहमी निसर्गाला हानीस पोचवलेली आहे. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास आपल्यापैकी अनेक जण करतातच परंतु या वनस्पतीशास्त्राचा अभ्यास तंत्र-मंत्र शास्त्र आणि अध्यात्म शास्त्रांमध्ये देखील महत्त्वाचा मानला गेलेला आहे. वनस्पती आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि आपल्याला प्रसन्न वाटण्यासाठी नेहमी सकारात्मक ऊर्जा देत असतात. असे अनेक वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत जे आपल्याला अनेक गोष्टी पुरवत असतात. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतात. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशीच एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही माहिती तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे.

झाडे हे नेहमी हिरवीगारच चांगले दिसतात. जर आपल्या घरामध्ये सुकलेली व निर्जीव झाडे असतील तर ते चांगले दिसत नाही यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याऐवजी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. जर तुमच्या घरामध्ये हे एक झाड असेल आणि हे झाड जर वारंवार सुकत असेल तर ते भविष्यासाठी चांगले नाही हे झाड तुम्हाला काहीतरी नकारात्मक संकेत देत आहेत. या झाडामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी निर्माण होऊ शकते. तुमचा वंश संपुष्टात येऊ शकतो. घरातील पैसा बाहेर जाऊ शकतो आणि घरामध्ये खूप साऱ्या आर्थिक अड’चणी निर्माण होऊन घरामध्ये कायमचे नुकसान निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडू शकतील.

आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे तुळशी. आपल्या सर्वांच्या अंगणासमोर तुळशी दिसून येते. ही तुळशी जर हिरवी असेल तर दिसायला अगदी टवटवीत आणि सकारात्मक दिसते परंतु जर ही तुळशी सूकायला लागली तर ती दिसायला विचित्र दिसते. आपल्या सर्वांना माहिती आहे की अध्यात्मशास्त्रांमध्ये तुळशीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तुळशीमध्ये अनेक देवी देवतांचा वास देखील आहे. तुळशीही आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर तुळशीच्या पानाचे अनेक उपयोग आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर तंत्र मंत्र शास्त्रामध्ये देखील तुळशीच्या पानांचा प्रामुख्याने उपयोग करण्यात आलेला आहे.

आपल्यापैकी अनेक जण जपमाळ करताना तुळशीच्या माळेचा प्रामुख्याने उपाय करत असतात आणि ही जपमाळ मानवी शरीराला शुद्ध करण्याचे कार्य करते आपण देवांना नैवेद्य अर्पण करत असताना एक तुळशीचे पान आवर्जून ताटामध्ये ठेवत असतो कारण की तुळशीच्या पानांमुळे अपवित्र गोष्टी पवित्र होऊन जातात. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप सुकलेले असेल तर अशावेळी तुळशीचे रोप बदलून पुन्हा नवीन तुळशी घरामध्ये आणा अन्यथा तुमच्या घरामध्ये गरिबी निर्माण होऊ शकते. त्यानंतर दुसरी वनस्पती आहे शमीचे झाड. शमीचे झाड आपल्या सर्वांना माहिती आहे यालाच आपण आपट्याचे झाड देखील म्हणतो. दसऱ्याच्या दिवशी या आपट्याच्या पानांची विशेष पूजा केली जाते.अध्यात्म शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये शमीचे झाड असते.

अशा व्यक्तींवर शनि देवांची चांगली नजर असते आणि शनिदेवाच्या कृपेने त्या व्यक्तीच्या जीवनात नेहमी सकारात्मक घटना घडत असतात. जर तुमच्या घरामध्ये शमीचे झाड हिरवेगार असेल तर तुमच्या घरामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडू लागतील परंतु जर सुकलेले झाड असेल तर यामुळे अनेक वाईट घटना घडण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच घरामध्ये झाड सुकले तर ते बदलून हिरवेगार झाड आवश्यक आणा. यानंतर तिसरे झाड आहे अशोकाचे. अशोकाचे झाड हे वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानले जाते.

हे झाड आपल्याला अनेकदा अंगणासमोर आणि बागेमध्ये पाहायला मिळते. या वनस्पतीच्या पानांचा वापर अनेकदा पूजा मध्ये देखील केला जातो. हे झाड नेहमी उंच उंच वाढत जाते म्हणूनच जर हे झाड तुमच्या अंगासमोर असेल तर हिरवेगार असणे अत्यंत गरजेचे आहे, जसे हे झाड हिरवेगार आहे आणि उंच उंच वाढत जाते तशी तशी तुमची प्रगती देखील वाढत जाते आणि म्हणूनच या झाडाला कधीच सुकू देऊ नका. हे झाड जर सुकले असेल तर नवीन बदलून पुन्हा नव्याने हिरवेगार झाड आणा अशा प्रकारे या काही झाडांची काळजी आपल्याला विशेष घ्यायची आहे जेणेकरून भविष्यात कधीच हे झाड सुकणार नाहीत.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *