१९ ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमा देवघरात नक्की ठेवा या 3 वस्तू लक्ष्मी येईल घरी
उद्या मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आली आहे. आश्विन महिन्यातील पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. असे म्हटले जाते की, या दिवशी देवी लक्ष्मी रात्रभर फिरत असतात व कोण कोण जागरण करत देवाच्या नामाचा जप करत आहे, याची विचारणा करत असतात.
आपण कोजागिरीच्या दिवशी आपल्या कुलदैवताच्या नामाचा जप नक्की करावा. कोजागिरीची रात्र ही शुभ मानली जाते, कारण सर्व देवी देवता या दिवशी भूतलावर उतरतात आणि चंद्रप्रकाशातून येणाऱ्या अमृतकणांचा लाभ घेतात. कोजागिरीच्या दिवशी आपण शक्य तितका चंद्रप्रकाश अंगावर घ्यायला हवा. चंद्राकडे एकटक पाहून त्रातक केल्याने दृष्टी ठीक होते. तर मित्रानो जाणून घेऊया, कोजागिरीच्या दिवशी घरात कोणकोणत्या गोष्टी ठेवल्याने लक्ष्मीचा वास होईल.
१. देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो- आपल्या घरात माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असतेच. जर आपल्या घरात माता लक्ष्मीचा फोटो उभा असेल तर घरात पैसे कधीच टिकत नाही. लक्ष्मी चंचल आणि चलायमान असते, ती एका ठिकाणी कधीच टिकत नाही. त्यामुळे लक्ष्मीजी बसलेल्या, एका हातातून धनवर्षाव आणि एक हात झुकलेला आहे अशी प्रतिमा घरात स्थापित करावी किंवा मातालक्ष्मी श्री विष्णूचे चरण दाबत असलेल्या मूर्तीची स्थापना करावी. ज्या घरात माता लक्ष्मीची अशी मूर्ती असते तेथे पैसे कधीच कमी पडत नाही. ज्या घरातील लक्ष्मीच्या मूर्तीवर उदासीनता आहे, तेथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यामुळे घरात नेहमी प्रसंन्न मुद्रेत असलेली माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी.
२. कवडी- तस तर कवडीचे १८५ प्रकार आहेत परंतु मुख्य पाच प्रकार आपल्याला कुठल्याही तीर्थक्षेत्रावर भेटतात. सोनेरी कवडी (सिद्ध कवडी), भुरकट कवडी (व्याघरी कवडी), पिवळी कवडी व सफेद कवडी यातील कुठलीही कवडी आपण खरेदी करून देवघरात पूजेसाठी घेऊ शकता. ज्याप्रकारे माता लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आल्या त्याचप्रमाणे कवडीची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झाल्याने माता लक्ष्मीस कवडी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच दीड तोळा वजनाची कवडी आपण कोजागिरीच्या दिवशी घरात स्थापित करावी.
३. दक्षिणावर्ती शंख-
हा शंख शुक्रवारी किंवा पौर्णिमा स्थितीला स्थापित करण्यास अगदी शुभ मानला जातो. स्थापना करताना याचे शुद्धीकरण करणे गरजेचे असते. घरात असलेले गंगाजल किंवा साध्या पाण्याने शुद्धीकरण केल्यासही चालते. आपल्या देवघरात बसून किंवा देव्हारा समोर बसून एका लाल रंगाच्या कपड्यावर या शंखाची स्थापना करा. त्यानंतर “ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः” या मंत्राचा ११ वेळा जप करा. आपली इच्छा असल्यास आपण आपल्या तिजोरीत सुद्धा या शंखाची स्थापना करू शकता. त्याचबरोबर घरात दररोज गंगाजल शिंपडावे.
Recent Comments