४ नवंबर रोजी माता लक्ष्मीला अर्पण करा या रंगाचे फूल, सुख-धन-पैसा ची कधीही कमतरता पडणार नाही.

दिनांक 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभ असा मानला जातो. या दिवशी आपण आपल्या संपूर्ण घरात दीप प्रज्वलित करतो, तसेच देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पा ची पूजा देखील करतो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी अंगणामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. सोबतच अनेक उपाय देखील यादिवशी केले जातात. परंतु तरी देखील माता लक्ष्मीची पूजा करताना किंवा अन्य कुठली तरी विधी करताना आपल्या हातून काही चुका नकळत घडून जातात आणि यामुळे आपल्या पूजेचा आपल्या व्रताचा तसेच आपण केलेल्या मंत्रजपाचा फळ आपल्याला मिळत नाही.

पौराणिक शास्त्रात लक्ष्मीपूजनाचा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. याच दिवशी माता लक्ष्मी समुद्रमंथनातून अवतरीत झाली होती. या दिवशी माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी वर प्रवास करत असते आणि ज्या घरात स्वच्छता असेल, सुख-शांती असेल आणि घरातील सर्व सदस्य ज्या घरात आनंदित असतील अशा घरात महालक्ष्मी प्रवेश करते. परंतु जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका ज्या आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजे.

१) अनेक जण या दिवशी फक्त माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची पूजा करतात. परंतु असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरात प्रवेश करत नाही. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा सोबत भगवान विष्णूची देखील पूजा करावी याने माता लक्ष्मी आपल्या घरात सर्वप्रथम प्रवेश करेल.

२) यादिवशी आपण देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आजे आणि तो दिवा माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. जर आपल्याकडून तुपाचा दिवा जमत नसेल तर तेलाचा दिवा प्रज्वलित करावा.

३) यादिवशी माता लक्ष्मीला लाल किंवा गुलाबी रंगाचे फूल आपण अर्पण करावे. हे रंग माता लक्ष्मीला प्रिय आहेत. चुकूनही पांढऱ्या रंगाचा फूल अर्पण करु नये, कारण माता लक्ष्मी ही सौभाग्यवती आहे. यादिवशी आपण गुलाब, जासवंद आदि फूल माता लक्ष्मीला अर्पण करु शकतो.

४) शक्य असेल तर आपण देखील लाल रंग असलेले वस्त्र परिधान करावे. ५) आपण चौरंगावर जो कपडा अंत थरतो तो देखील लाल रंगाचाच असावा. चुकूही पांढरा कापड वापरु नका.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *