23 नोव्हेंबर कार्तिक अमावस्याच्या दिवशी करा हे प्रभावी उपाय जीवनातील सर्व अड’चणी बाधा होतील नष्ट!
मित्रांनो हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीला एक विशिष्ट महत्त्व आहे. मग ती पौर्णिमा असू दे, अमावस्या असू दे, प्रदोष असू दे किंवा एकादशी असू दे.. प्रत्येक तिथीला वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक तिथीला काही उपाय देखील केले जातात तसेच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो,यामध्ये वास्तुशास्त्र, अध्यात्म शास्त्र, समुद्र शास्त्र, शगुन शास्त्र तसेच ज्योतिषशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जातो. ज्योतिषशास्त्र हे असे एक शास्त्र आहे ज्यामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र, आकाश मंडळ यांच्या बद्दल अभ्यास करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय देखील जाणून घेणार आहोत. अनेकांच्या जीवनामध्ये सर्व सुरळी चालत असताना अचानक काहीतरी घडतं आणि संपूर्ण जीवनच नकारात्मक होऊन जाते. जर एकदा तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर ही नकारात्मक ऊर्जा लवकर बाहेर निघत नाही आणि अशावेळी आपल्या जीवनाचा पूर्णपणे सत्यानाश होऊन जातो.
परंतु अध्यात्म शास्त्रामध्ये असे काही उपाय तोडगे सांगण्यात आलेले आहेत यांच्या मदतीने आपण आपले जीवन समृद्ध बनू शकतो परंतु कोणतेही उपाय करत असताना ते मनापासून करणं गरजेचं आहे. आपली श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते परंतु अनेक जण कोणतेही उपाय करत असताना मेहनत मात्र करत नाही, असे करू नका. प्रत्येक उपायाला मेहनतीची जोड असणे गरजेचे आहे कारण की श्रद्धा ही फक्त उपाय तोटके करून होत नाही तर त्याला मेहनतीची जोड आणि भाव देखील मनामध्ये असणे गरजेचे आहे. 23 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिक अमावस्या आहे. ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम मिळणार आहे. ही अमावस्या प्रामुख्याने ज्या व्यक्तींना ग्रहदोष आहे पितर दोष आहे, वास्तुदोष आहे अशा व्यक्तींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. बहुतेक वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक घटना घडवू लागतात. आपण एखादे कार्य करतो परंतु ते कार्य अपूर्ण राहते. कार्य करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अड’चणी निर्माण होत असतील तर अशा व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी सूर्यास्त झाल्यावर एक कणकेचा गोळा म्हणजेच दिवा तयार करायचा आहे आणि तो दिवा घेऊन आपल्याला शंकराच्या मंदिरात जायचे आहे आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे.
हा दिवा आपल्याला पितरांच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे,असे केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दोषापासून मुक्तता मिळेल इतर म्हणजे आपले पूर्वज हे पूर्वज जर त्यांना मुक्ती मिळाली नसेल तर किंवा कळत नकळतपणे आपल्याकडं त्यांचा अपमान झाला असेल तर त्यांना क्षमा याचना करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, असे केल्याने देखील तुमच्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होऊन जातील. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी पिठीसाखर टाकायची आहे आणि याचे बारीक बारीक गोळे बनवून मुंग्यांना किंवा जलाशयामध्ये तलावामध्ये जाऊन माशांना हे गोळे खाऊ घालायचे आहे असे केल्याने देखील आपले नशीब पालटून जाणार आहे. तुमच्या हातून जर नकळतपणे काही वाईट कर्म झाले असतील तर यातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. जर तुमच्यावर खूप सारे कर्ज असेल तर अशावेळी मुंग्यांना साखर देणे किंवा पिठाचे गोळे खायला देणे शुभ ठरते, अशामुळे देखील तुमच्यावर कितीही कर्ज असेल तर ते कर्ज दूर होऊन जाते.
जर तुम्हाला एखादा ग्रहदोष असेल किंवा शनी पीडा असं साडेसाती पासून तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल तर अशावेळी अमावस्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाच्या कुत्र्याला एक तुपाची चपाती खाऊ घालायची आहे, असे केल्याने देखील तुम्हाला फरक जाणवू लागेल. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला एक विशिष्ट महत्त्व आहे त्यातील एक शुभ दिशा म्हणजे ईशान्य दिशा. ईशान्य दिशाही परमेश्वराची दिशा मानली जाते आणि म्हणूनच घरातील ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ धुवायची आहे व अमावस्या या दिवशी आपल्याला या दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे परंतु हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला या दिव्याला आसन देखील द्यायचे आहे, यासाठी तुम्ही एक वाटी घेऊ शकता किंवा दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा गहू देखील ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, असे केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करते. जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये प्रत्येक सदस्य आजारी पडत असेल तर अशावेळी आपल्याला बेलाच्या झाडाचे फळ घ्यायचे आहे.
बेल हे शिव शंकराला प्रिय आहे आणि म्हणूनच बेलाचे फळ अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. अमावस्या दिवशी आपल्याला हे फळ आणायचे आहे आणि घरातून सर्व कोपऱ्यात आपल्याला फिरवायचे आहे आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना या फळाला हात लावायला सांगायचे आहे व हे फळ पिंपळाच्या झाडाखाली एक खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये पुरायचे आहे, असे केल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक दिसून येईल तसेच लिंबू हे तंत्र मंत्र शास्त्र मध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. लिंबू च्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील वाईट शक्ती दूर करू शकता. या दिवशी आपल्याला लिंबू आणायचा आहे आणि एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा तुमच्या घरामध्ये अनेक नको त्या घटना घडत असतील तर अशावेळी हा लिंबू पूर्ण घरातून सात वेळा आणि एखाद्या व्यक्तीवर देखील सात वेळा उतरवायचा आहे आणि त्यानंतर हा लिंबू घरातून बाहेर पडताना आपल्याला ज्या ठिकाणी चार असतात ते एकत्र येतात अशा ठिकाणी गपचूप ठेवायचा आहे आणि हा लिंबू ठेवल्यानंतर मागे वळून न पाहता घरी यायचे आहे व आपल्या देव्हारा जवळ बसून प्रार्थना करायची आहे, असे केल्याने देखील तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाईल व तुम्हाला काही दिवसातच सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
Recent Comments