30 ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमीला करा हे ११ उपाय आणि मिळवा पैसा,सुख आणि अनेक काही…

जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. तंतशास्त्रानुसार चार रात्र अशा आहेत की ज्यात योग्य ती विधी केल्यास आपल्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होऊ शकतात.यात एक रात्र म्हणजे जन्माष्टमी ची रात्र. यादिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.मित्रांनो जन्माष्टमीच्या दिवशी आपण काही ११ उपाय करु शकता ज्याने आपल्याला धनप्राप्ती, सुख, ऐश्वर्य आणि इच्छुक असलेल्या क्षेत्रात यश लाभेल.

●जन्माष्टमीच्या दिवशी सगळ्यात आधी धनप्राप्ती साठीचा उपाय आहे.ज्यांच्या जीवनात अनेक आर्थिक समस्या आहेत, आर्थिक तंगी आहे.त्यांनी यादिवशी सकाळी लवकर उठून लवकर आंघोळ करून भगवान कृष्णाला पिवळ्या रंगाची माळ अर्पण करावी.यामुळे भगवान कृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर धनवर्षा व्हायला सुरूवात होते.

●भगवान श्रीकृष्णाला पीतांबरधारी असे म्हणतात.पीतांबर म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र.त्यामुळे यादिवशी आपण कृष्णाच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई,पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावी. आणि मग उरलेले वस्तु गोर-गरीबांमध्ये दान करून टाकावी. यामुळे भगवान कृष्ण तर प्रसन्न होतातच सोबत देवी लक्ष्मी ही खुश होते. आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्ति येते.

●जर आपली एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दक्षिणावर्ती शंखामध्ये जल भरा आणि या जलाने भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक करा. यानंतर येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी याची पुनःवृत्ती करा.यामुळे देवी लक्ष्मी आपल्यवर खुश होईल आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

●ज्यांना आपल्या जीवनात ऐश्वर्य हव आहे,प्रत्येक गोष्टीची लालसा आहे अशा लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पांढऱ्या रंगाची मिठाई नैवेद्य दाखवावी किंवा त्यापेक्षा ही चांगल तांदळाची खीर बनवावी आणि त्यात सुखा मेवा चा देखील वापर करावा.या खीर मध्ये खडी साखर वापरावी.यामुळे देखील
आपल्याला सर्व ऐश्वर्य प्राप्त होतील.

●जर आपले कुठले तरी काम खुप प्रयत्न करून ही पूर्ण होत नसेल तर आपण भगवान कृष्णाच्या मंदिरात कृष्णाला एक पूर्ण नारळ आणि ११ बादाम चढवावी.यामुळे आपल्या रहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

●जर आपल्या धंद्यात मंदी असेल, धंदा बरोबर चालत नसेल तर आपण जनमाष्टमीच्या दिवशी आपल्या घरी सात कन्यांना बोलवा आणि त्यांना तांदळाची खीर खायला द्या सोबतच त्यांना काही भेटवस्तू ही द्या. जन्माष्टमीनंतर येणाऱ्या ५ शुक्रवार पर्यंत आपल्याला याची पुनःवृत्ती करायची आहे.यामुळे आपल्या धंद्यात तेजी येईल.

●अपार धन मिळवण्यासाठी आपण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला विड्याचे पान अर्पण करा. या पानावर कुंकूने श्री असे लिहा.आणि हे पान आपण जिथे जिथे पैसे ठेवतो. तिथे तिथे हे पान ठेवा यामुळे आपल्यावर नेहमीच धनवर्षा होत राहील.

●आपल्या जीवनात जर खुप संघर्ष असेल आणि आपले सगळ्यांसोबत जर भांडणे होत असतील तर आपण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून कृष्णाच्या मंदिरात जाऊन कृष्णाला तुळशीची माळ घालावी आणि ‘ॐ नमो वासुदेवाय नमः’ या मंत्राचा ११ माळा उद्घोष करावा. यामुळे आपल्या जीवनातील अस्थिरता दूर होते,संघर्षाची परिस्थिती दूर होते आणि मित्रमंडळीसोबत प्रेमाचे संबंध तैयार होतात.

●जर आपल्या कुटुंबामध्ये नेहमीच कलह किंवा भांडणे होत असतील तर आपण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी जवळ दिवा लावावा आणि ‘ॐ नमो वासुदेवाय नमः’ या महामंत्राचा जप करत ११ प्रदक्षिणा घालाव्या.यामुळे आपल्या कुटुंबामधील भांडणे संपतात व सागळे प्रेमाने राहायला सुरुवात करतात.

●जर आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करायचे असेल तर आपण आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावे.यामुळे आपली समाजात प्रतिष्ठा ही वाढेल.

●आणि जर आपल्याला हे यश टिकवून ठेवायचे असेल तर , पैसे टिकवून ठेवयचे असेल तर आपण येणाऱ्या या जन्माष्टमीच्या रात्रि भगवान कृष्णाला केशरयुक्त खीर नैवेद्य दाखवा.यामुळे द्वारकाधीश आपल्यावर खुश होतील आणि आपला पैसा ,आपले यश टिकवून ठेवतील.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *