31 ऑगस्ट गणेश चतुर्थी घरात घेऊन या बाप्पांची अशी मूर्ती बनाल करोडपती
घरात घेऊन या बाप्पांची अशी मूर्ती
१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी, २) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,
३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. ४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,
५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे, ६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,
७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी.विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,
८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.
९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये,
१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद करु नये.
Recent Comments