33 वर्षांनी दिसणार माघ पौर्णिमेचा चंद्र अचानक चमकू शकते या 6 राशींचे भाग्य धन लाभ
मित्रांनो हिंदू शास्त्रानुसार माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असून असे म्हणतात की या पौर्णिमेला देवता देखील पृथ्वीवर येऊन गंगास्नान करतात. मित्रांनो या पौर्णिमेच्या संयोगावर गंगा स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापातून मुक्तता होऊन मोक्षप्राप्ती होते. माघ पौर्णिमेला दान देण्याचे खूप महत्त्व सांगितले असून, हा दिवस अतिशय पवित्र मानण्यात आला आहे.
दिनांक 15 फेब्रुवारी रोज मंगळवार रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी सुरु होणार असून दिनांक 16 फेब्रुवारी रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. आणि सोबतच माघस्नान समाप्त होणार आहे, हा अतिशय शुभ संयोग असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या 6 राशींचे भाग्य चमकणार असून यांना सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे, तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी..
पहिली राशी आहे मेष…!मेष राशीच्या जीवनातील कार्यक्षेत्राची गाडी योग्य दिशेने धावणार आहे, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग येऊ शकतात. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहणार असून, खर्चाचे प्रश्न सुटणार नसले तरी कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो, मन शांती भंग होऊ शकते रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
दुसरी राशी आहे वृषभ राशी…!उद्योग धंदा किंवा नोकरीत असलेले गैरसमज दूर झाल्यामुळे नव्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल होणार आहे. पण आपल्या मनातल्या महत्त्वाच्या गोष्टी उगाच कोणालाही सांगत बसू नका, नेहमी स्वतःचाच हक्क गाजवण्यापेक्षा कधीकधी दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोणत्याही महत्त्वपूर्ण कामासाठी इथून पुढचा काळ शुभ ठरणार आहे. तरी मित्र किंवा नातेवाईकांवर अवलंबून राहू नका.
यानंतर आहे सिंह राशि…!आत्मविश्वासाच्या बळावर घेतलेले निर्णय योग्य ठरणार आहेत. पण नियोजनाला आणखी मजबूत करून कृतीय स्थिती जोड दिल्याने कामे आणखीनच सुंदर बनतील, कामानिमित्त प्रवास घडणार असून, तबियत बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास करताना सावध राहणे गरजेचे आहे, जोडीदाराच्या सहकार्यामुळे आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे..
यानंतर आहे तूळ राशी…!शनिदेव आपली परीक्षा घेणार असले, तरी स्वतःच्या तर्कपूर्ण बुद्धीचा वापर करून समत्व वृत्तीच्या बळावर प्रत्येक परीक्षा पास कराल. तुमच्यात असणारी सहनशीलता हीच तुमची शक्ती असून याचा पुरेपूर वापर करून, परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त कराल . आर्थिक प्राप्ती पण चांगली राहणार आहे..
यानंतर आहे धनु राशि…!जीवनात संकटे येतील पण त्यातून मार्ग ही काढण्याचा रस्ता सुद्धा मिळणार आहे. व्यापारात धनप्राप्ती विषयी काहींशा अडचणी अर्थडे निर्माण होत असले तरी कुठून ना कुठून आर्थिक प्राप्ती होत राहणार आहे, आणि हीच तुमची जमेची बाजू ठरणार आहे.
यानंतर आहे वृश्चिक राशि…!
शनीचा ने जो झटका दिला आहे. त्यातुन सावरण्यास थोडासा वेळ लागणार असला, तरी तुमच्या असणारा आत्मविश्वास आणि तुमची जिद नक्कीच तुम्हाला समोर घेऊन जाणार आहे. इथून पुढचा काळ नवीन कीर्तिमान स्थापन करण्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
Recent Comments