ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्यवाणी नाही तर ग्रहांच्या हालचालींचा आणि त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास आहे. प्रत्येक ग्रह-योग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. यामध्ये गजकेसरी राजयोग हा एक अत्यंत शुभ आणि सामर्थ्यशाली योग मानला जातो. हा योग आयुष्यात मान-सन्मान, संपत्ती, कीर्ती आणि करिअरमध्ये झपाट्याने प्रगती घडवतो.
आज आपण जाणून घेऊया गजकेसरी योग म्हणजे काय, त्याचे परिणाम आणि कोणत्या राशींना याचा जास्त फायदा होणार आहे.
गजकेसरी योग म्हणजे काय?-
गजकेसरी योग हा गुरु (बृहस्पति) आणि चंद्र या शुभग्रहांच्या संयोगाने तयार होतो.जेव्हा चंद्र आणि गुरु केंद्रस्थानी (१, ४, ७, १० घरात) एकत्र येतात किंवा एकमेकांवर दृष्टिक्षेप टाकतात तेव्हा हा शुभ योग निर्माण होतो.
गज म्हणजे हत्ती – शक्ती, सामर्थ्य आणि स्थैर्याचे प्रतीक.केसरी म्हणजे सिंह – धैर्य, कीर्ती आणि मान-सन्मानाचे प्रतीक.म्हणजेच हा योग ज्यांच्या जन्मकुंडलीत असेल किंवा ग्रहगोचरामुळे सक्रिय झाला असेल,त्यांना हत्तीची स्थिरता आणि सिंहाची कीर्ती लाभते.
या राशींवर विशेष कृपा -
1. ♋ कर्क राशी -कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळतील.कुटुंबातही मान-सन्मान वाढेल.
2. ♌ सिंह राशी -सिंह राशीवर गजकेसरी योगाचा खास आशीर्वाद राहील.या राशीतील लोकांच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. पदोन्नतीची शक्यता खूप जास्त आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. जो कोणी स्पर्धा परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देत आहे त्याला शुभवार्ता मिळू शकते.
3. ♐ धनु राशी -धनु राशीच्या जातकांना हा योग प्रचंड फायदेशीर ठरणार आहे.आर्थिक लाभ,व्यवसायात वाढ आणि विदेशी संधी मिळण्याची शक्यता आहे.ज्यांना समाजसेवा,राजकारण किंवा अध्यापनाशी संबंधित क्षेत्रात काम करायचे आहे त्यांना विशेष यश मिळेल.
4. ♓ मीन राशी - मीन राशीवाल्यांसाठी गजकेसरी योग सोन्याहून पिवळा ठरेल.नवीन प्रोजेक्ट्स, परदेश प्रवास किंवा करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो.मानसिक शांती,आत्मविश्वास आणि कौटुंबिक सुख लाभेल.
गजकेसरी योगात करावयाचे उपाय-
ग्रहांची कृपा अधिक वाढवण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात:
गुरुवार उपासना – गुरुवारी पिवळे कपडे परिधान करणे, देवगुरु बृहस्पति यांची पूजा करणे.
चंद्र शांती – सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करणे आणि दुध दान करणे.
दान धर्म – गरीबांना अन्न, कपडे किंवा पुस्तके दान करणे.
मंत्रजप – “ॐ बृं बृहस्पतये नमः” आणि “ॐ चंद्राय नमः” या मंत्रांचा जप करणे.
हे उपाय केल्याने गजकेसरी योगाचे शुभ परिणाम अधिक प्रभावीपणे अनुभवता येतात.
Post a Comment